Fri, Apr 26, 2019 03:40होमपेज › Kolhapur › ..पण लाच खाण्याचे तेवढे आवरा; महसूलमंत्र्यांचा तलाठ्यांना दम

..पण लाच खाण्याचे तेवढे आवरा; महसूलमंत्र्यांचा तलाठ्यांना दम

Published On: Dec 24 2017 6:48PM | Last Updated: Dec 24 2017 5:41PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

लॅपटॉप देतो, संपातील नऊ दिवसाचा पगार जमा देण्यासाठी अधिकार्‍यांना सूचना देतो, पण लाच खाण्याचे तेवढे आवरा. एवढा चांगला पगार मिळत असताना ५०० रुपयांसाठी तलाठी अँटी करप्शनला सापडतो म्हणजे, असा सवाल करुन यापुढे असले प्रकार चालणार नाहीत. कामातील अप्रमाणिकपणा खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशारा महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तलाठ्यांना भरला. तसेच फेब्रुवारी २०१८ अखेरपर्यंत राज्यातील सर्व सात/बारा पाडव्याच्या मुहूर्तावर ऑनलाईन करून विजयाची गुडी उभारण्यासाठी सर्व तलाठ्यांनी कामाला लागावे, अशी सूचनाही त्यांनी केली. 

महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्यावतीने राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा व आमसभा लोणार वसाहत येथील गणेश लॉन येथे झाला. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. या मेळाव्याला प्रमुख पाहूणे म्हणून जमावबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, करवीरचे प्रातांधिकारी सचिन इथापे आदी उपस्थित होते.