Mon, Mar 25, 2019 17:27होमपेज › Kolhapur › डॉ. योगेश जाधव यांचा कोल्‍हापुरात नागरी सत्‍कार 

डॉ. योगेश जाधव यांचा कोल्‍हापुरात नागरी सत्‍कार 

Published On: Jul 13 2018 1:23AM | Last Updated: Jul 14 2018 3:08PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

उर्वरित महाराष्‍ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्‍याबद्दल डॉ. योगेश जाधव यांचा कोल्‍हापूरच्या नागरिकांच्या वतीने सत्‍कार करण्यात आला. सिक्‍कीमचे राज्‍यपाल डॉ. श्रीनिवास पाटील यांच्या हस्‍ते शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन डॉ. जाधव यांचा सत्‍कार करण्यात आला. 

या सत्‍कार सोहळ्यासाठी कोल्‍हापूरच्या महापौर सौ. शोभा बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नागरी सत्‍कार समिती स्‍थापन करण्यात आली होती. कोल्‍हापूरच्या जनतेच्या वतीने महापौर सौ. बोंद्रे यांनी डॉ. जाधव यांना मानपत्र देऊन गौरव केला. 

या सोहळ्याच्या अध्यक्षस्‍थानी कोल्‍हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. बिहारचे माजी राज्‍यपाल डॉ. डी. वाय. पाटील, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासह कोल्‍हापूरचे सर्व आमदार आणि पश्चिम महाराष्‍ट्रातील तमाम लोकप्रतिनिधींच्या उपस्‍थितीत केशवराव भोसले नाट्यगृहात हा सोहळा पार पडला. 

अपडेट : 

डॉ. योगेश जाधव यांना शुभेच्‍छा देण्यासाठी आलेले कोल्‍हापूरकर

Image may contain: 3 people, people standing, hat and outdoor

राष्‍ट्रगीताने सत्‍कार सोहळ्याची सांगता
Image may contain: 3 people, people smiling, people standing

महापौर शोभाताई बोंद्रे यांनी हा सत्कार करुन कार्यक्रमाची शोभा वाढवली : डॉ. श्रीनिवास पाटील

सिक्‍कीमचे राज्यपाल डॉ. श्रीनिवास पाटील यांचे भाषण सुरू

Image may contain: 7 people, including Anna Gurav and Abhinav Buchade

डॉ.योगेश जाधव यांची निवड सार्थ असल्याचेच त्यांच्या भाषणातून दिसून येते : चंद्रकांत पाटील

सत्‍कार सोहळ्याचे अध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अध्यक्षीय मनोगत सुरू

Image may contain: 3 people, people smiling

सामान्य माणसाचे प्रश्न डोळ्यासमोर ठेऊन कार्यरत राहणार : डॉ. योगेश जाधव

पुढारीने पत्रकारितेबरोबरच समाज सुधारणेचे काम केले :डॉ. योगेश जाधव

Image may contain: 6 people, people standing

डॉ. योगेश जाधव यांनी सत्‍काराला उत्तर देताना कोल्‍हापूरकरांचे आभार मानले.

सिक्कीम विद्यापीठाने डॉक्टरेट दिल्याबद्दल डॉ. श्रीनिवास पाटील यांचा सत्‍कार करण्यात आला

सिक्‍कीमचे राज्यपाल डॉ. श्रीनिवास पाटील आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्‍ते डॉ. योगेश जाधव यांचा सत्‍कार

Image may contain: 4 people, people standing

प्रमुख पाहुणे शाहू महाराज मनोगत व्यक्‍त करताना

शरद पवार पंतप्रधान होतील : डॉ. डी.वाय. पाटील

माजी राज्यपाल डी.वाय पाटील  मनोगत व्यक्त करत आहेत

Image may contain: 6 people, including Abhinav Buchade, people sitting

व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्‍कार सोहळा सुरू

महापौर शोभा बोंद्रे यांच्याकडून कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक

Image may contain: 4 people, including Aureo D'Cunha, people smiling

सत्‍कार सोहळ्यासाठी सभागृह आणि सभागृहाबाहेर मोठी गर्दी

डॉ. योगेश जाधव यांच्या सत्‍कार सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात; व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थीत

सिक्‍कीमचे राज्यपाल डॉ. श्रीनिवास पाटील यांचे कार्यक्रमस्‍थळी स्‍वागत करताना डॉ. योगेश जाधव

शाहीर नायकवडी आणि चमूचा छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्यावर पोवाडा

Image may contain: 6 people, including Pravin Shinde and Rahul Thorat Sangli, people standing and indoor

शाहीर आझाद नायकवडी यांच्या महाराष्‍ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात