Tue, Sep 25, 2018 04:43होमपेज › Kolhapur › कोल्हापूरचे आयपीएस श्रीधर पाटील यांच्यावर ‘कठुआ’ची जबाबदारी

श्रीधर पाटील यांच्यावर ‘कठुआ’ची जबाबदारी

Published On: Apr 26 2018 1:23AM | Last Updated: Apr 26 2018 7:21AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शाहूवाडी तालुक्यातील कुरूकवाडी येथील श्रीधर पाटील हे आयपीएस आहेत.  जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात घडलेल्या बालिका अत्याचार प्रकरणाने देश ढवळून निघाला आहे. कठुआ जिल्ह्यातही याचे पडसाद सुरूच आहेत. या परिस्थितीत या जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदाची जबाबदारी कोल्हापूरच्या श्रीधर पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पीडितेला न्याय देण्याची जबाबदारी श्रीधर पाटील यांच्यावर असणार आहे. 

शाहूवाडी तालुक्यातील श्रीधर पाटील हे 2010 च्या आयपीएस बॅचचे आहेत. त्यांचा प्रशिक्षण कालावधी हा जम्मू-काश्मीरमध्येच गेला आहे. तसेच त्यांचे पहिले पोस्टिंगसुद्धा श्रीनगर येथे झाले. यानंतर अवंतीपूर, कुलगाम आदी जिल्ह्यांत त्यांनी स्वतंत्रपणे पोलिस अधीक्षक म्हणून चांगले काम केले आहे. पाटील यांना जम्मू-काश्मीरच्या एकूण परिस्थितीचा चांगला अभ्यास आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था कुशलपणे सांभाळण्याची त्यांची सर्वोच्च क्षमता असल्याचे त्यांनी यापूर्वी दाखवून दिले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून पाटील यांना देशासह जगभरातील माध्यमांचे लक्ष लागून राहिलेल्या कठुआ जिल्ह्याचा पदभार दिला आहे. बालिका अत्याचार प्रकरणाचा सखोल तपास आणि त्यानंतर दोषींवर कठोर कारवाईसाठी कार्यवाही करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. 

Tags : Kolhapur, responsibility,  Kathua, case, Kolhapur, IPS, Shridhar Patil