Mon, May 27, 2019 07:55होमपेज › Kolhapur › पंचगंगा घाटाचा बदलणार लूक

पंचगंगा घाटाचा बदलणार लूक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

चिखल, दलदल, हार-तुरे, सुकलेली फुले, प्लास्टिकचा कचरा, असे पंचगंगा घाटाचे ओंघळवाणे चित्र आता लवकरच बदलणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत कोल्हापूर येथील पंचगंगा नदीघाट सुशोभीकरणासाठी 26 कोटींची कामे मंजूर करण्यात आली असून, पाच कोटी रुपये खर्चाच्या पहिल्या टप्प्यातील कामांना नुकताच प्रारंभ झाला आहे. या विकासकामांमुळे पंचगंगा घाटाचा लूक बदलणार आहे. 

पंचगंगा नदीघाटाचे सौंदर्य वाढविणे, नागरिकांना फिरण्यासाठी एक चांगले ठिकाण निर्माण करण्याच्या हेतूने या घाटाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात जमिनीचे सपाटीकरण करण्यात येत असून, संपूर्णपणे संरक्षक भिंत व संरक्षक कठडा बांधण्यात येणार आहे. या संपूर्ण परिसरात बगिचा विकसित केला जाणार आहे. नागरिकांना बैठक व्यवस्था असावी म्हणून ठिकठिकाणी विसावा कट्टे बांधण्यात येणार आहेत. जुन्या घाटाचे नूतनीकरण करण्याबरोबरच नवीन घाट बांधण्यात येणार आहे.घाटाचा ऐतिहासिक लूक कायम राहावा यासाठी संपूर्ण दगडी बांधकाम केले जाणार आहे. पदपथाचे काम करण्यात येणार आहे. 

घाटावरील दीपमाळांचे मजबुतीकरण करून त्यांचा लूक कायम राखून सौंदर्यीकरणाचे काम केले जाणार आहे. मंदिरांची डागडुजी करून सुशोभीकरण करण्याचे नियोजन आहे. जुना संपूर्ण घाट विकसित करण्याबरोबरच नवीन घाट बांधण्यात येणार आहे. विरंगुळा केंद्र बांधण्यात येणार आहे. नवीन योग साधना इमारत बांधण्यात येणार आहे. तसेच पोहण्यासाठी येणार्‍यांना चेंजिंग रूम बांधली जाणार आहे. स्त्री-पुरुषांसाठी प्रसाधनगृहांची व्यवस्था केली जाणार आहे. बागबगिचा, शोभेची झाडे, फूलझाडे लावून या परिसरात जास्तीत जास्त वृक्षांची जोपासना करण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून पंचगंगा घाटाचा लूक बदलण्यात येणार आहे.

Tags  :  Kolhapur, Kolhapur News, renovation, Panchganga, Ghat


  •