Fri, Aug 23, 2019 14:28होमपेज › Kolhapur › सिद्धाळा गार्डन परिसरात दोन मटका अड्ड्यांवर छापा

सिद्धाळा गार्डन परिसरात दोन मटका अड्ड्यांवर छापा

Published On: Feb 09 2018 2:00AM | Last Updated: Feb 09 2018 12:41AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मंगळवार पेठेतील सिद्धाळा गार्डन परिसरातील दोन मटका अड्ड्यांवर गुरुवारी रात्री छापा टाकण्यात आला. यावेळी 19 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 45 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाचे पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांच्या पथकाने केली.

शहरात मोठ्या प्रमाणात दिवसाढवळ्या चोरी, दरोडे, लूटमारीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणेवर टीका होत आहे. असे असतानाच राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवार पेठेत दोन ठिकाणी मटका सुरू असल्याची तक्रार नागरिकांनी आय.जी. कार्यालयाच्या आय.जी.100 ग्रुपवर केली. ही माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक राणे यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने या दोन मटका अड्ड्यांवर छापा टाकला. या छाप्यात 19 जणांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत 45 हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 
राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मटका अड्ड्यावर आय.जी. कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी कारवाई केली आहे. त्यामुळे राजवाडा पोलिस करतात काय, असा सवाल या भागातील नागरिक करत आहेत. मटका चालवणार्‍यांवर कारवाई करण्यासह ज्या अधिकार्‍यांनी याकडे दुर्लक्ष केले, त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी होत आहे.