Sat, Apr 20, 2019 08:21होमपेज › Kolhapur › ‘आता पोलिसांची दबंगगिरी नाही तर दबावगिरी’

‘आता पोलिसांची दबंगगिरी नाही तर दबावगिरी’

Published On: Dec 25 2017 1:33AM | Last Updated: Dec 25 2017 1:33AM

बुकमार्क करा

 राशिवडे:  प्रतिनिधी 

परिते शाहूनगर (ता. करवीर) येथे हॉटेलवर झालेल्या भांडणाची चौकशी करण्यासाठी आलेल्या करवीर पोलिस ठाण्यांच्या कर्मचार्‍यांनी दबंगगिरी न करता स्टंट करत दबावगिरी अवलंबली. वडापला न हात करता बिगरपरवाना वाहन चालविणार्‍यांना दबाव टाकत दंडात्मक कारवाई केली. करवीरच्या या पोलिसांच्या  कारवाईबद्दल संताप व्यक्त होत आहे. आज सकाळी 11 नंतर करवीर पोलिसांनी परिते येथे एका हॉटेलवर झालेल्या हाणामारीच्या चौकशीसाठी हजेरी लावली. चौकशी करता करता येणार्‍या मोटारसायकलसह अन्य खासगी वहानांची चौकशी व तपासणी सुरू केली. मुल्ला व खडके नामक कर्मचार्‍यांनी तर दबंगगिरीच सुरू केली. मुल्ला नामक पो. कर्मचार्‍याने तर अर्वाच्य शिवीगाळ करत सहनशीलतेचा अंत गाठला.

परिते-गारगोटी फाट्यावर ठाण मांडून बसलेल्या या कर्मचार्‍यांनी तर दबावगिरी करत एकेरी भाषा वापरत खाकीची धमक दाखविली; परंतु करवीर पोषलसांच्या या दबावगिरीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत वहानधारकांनी शिव्यांची लाखोली वाहिली. करवीर ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी  दबावाचे तंत्र अवलंबले. वयस्क वहानधारकांना एकेरी, शिव्याची लाखोली वहात कारवाईचा बडगा उगारला, त्यामुळे या पोलीसी गुंडाबद्दल नाराजीचासुर उमटत होता यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.