Tue, Apr 23, 2019 01:50होमपेज › Kolhapur › गडहिंग्लजला आढळला दुर्मीळ उडता सोनसर्प

गडहिंग्लजला आढळला दुर्मीळ उडता सोनसर्प

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

गडहिंग्लज : प्रतिनिधी

संकल्पनगरात राहणार्‍या गजानन सावर्डेकर यांच्या घराजवळ उडता सोनसर्प आढळून आला. पश्‍चिम घाटातील मोठ्या जंगलामध्ये आढळणारी ही दुर्मीळ प्रजात गडहिंग्लज भागात प्रथमच आढळून आल्याने पर्यावरणप्रेमींकडून आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. सावर्डेकर यांना घरामागे साप आढळून आला.

यावेळी त्यांनी तत्काळ अ‍ॅनिमल रिट्रायविंग असोसिएशनचे प्राणीमित्र हेमंत तोडकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी येऊन पाहणी केली असता हा निमविषारी उडता सोनसर्प असल्याचे सांगितले. सावर्डेकर यांच्या घराच्या मागील बाजूस खिडकीजवळ गडहिंग्लजचे वनरक्षक व कर्मचार्‍यांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले. यावेळी त्याचे निरीक्षण करून त्याला जंगल आधिवासात मुक्‍त करण्यात आले. 

Tags : Kolhapur, Kolhapur News, rare, sonesarp, snake, Gadhinglaj


  •