Sun, May 26, 2019 21:07होमपेज › Kolhapur › मुलीस मारण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार 

मुलीस मारण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार 

Published On: Feb 09 2018 2:00AM | Last Updated: Feb 09 2018 12:51AMइचलकरंजी : प्रतिनिधी 

मालमत्तेच्या वादातून आणि मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडून त्याची व्हिडीओ क्लिप तयार केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी वडगाव बाजार समितीजवळ घडली. याप्रकरणी गावभाग पोलिसांनी अजय प्रकाश इंगळे याच्यावर बलात्काराचा, तर पोपटराव आनंदराव इंगवले, अभिजित पोपटराव इंगवले, प्रदीप माळी, शुभम इंगवले, सुरेश कचरे यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी अजय इंगळे याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला रविवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. याबाबत पीडित महिलेने गावभाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मालमत्तेच्या वादातून पीडित महिलेस संशयित  पोपटराव इंगवले, अभिजित इंगवले, प्रदीप माळी, शुभम इंगवले, सुरेश कचरे यांनी तिच्या मुलीस जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर  पीडित महिलेस अजय इंगळे यांच्याशी शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. या शरीर संबंधाची व्हिडीओ क्लिप अभिजित इंगवले याने मोबाईलवर तयार केली.