Fri, Feb 22, 2019 18:09होमपेज › Kolhapur › इचलकरंजीत दिव्यांग मुलीवर बलात्कार

इचलकरंजीत दिव्यांग मुलीवर बलात्कार

Published On: Feb 21 2018 1:12AM | Last Updated: Feb 21 2018 1:06AMइचलकरंजी : प्रतिनिधी

दिव्यांग मुलीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रकार उघडकीस आला. नागरिकांनी संशयित सुरेश पांडुरंग बरकाळे (वय 39, रा. शहापूर) याला बेदम चोप देत गावभाग पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, 22 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पीडित मुलगी घरासमोर थांबली होती. त्यावेळी संशयित सुरेश याने तिला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसविले. शहापूर येथील निर्जनस्थळी नेऊन मानसिकद‍ृष्ट्या असमर्थ असल्याचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला.