होमपेज › Kolhapur › अल्पवीयन मुलीवर बलात्कार; रामनगरच्या एकाविरूध्द गुन्हा

अल्पवीयन मुलीवर बलात्कार; रामनगरच्या एकाविरूध्द गुन्हा

Published On: Dec 29 2017 1:34AM | Last Updated: Dec 29 2017 1:14AM

बुकमार्क करा
शियेः वार्ताहर 

नागाव (ता. हातकणंगले) येथील अल्पवयीन मुलीला लग्नाच्या आमिषाने बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सागर सुभाष पाटील (रा . रामनगर, शिये, ता. करवीर ) याच्या विरोधात शिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा केला आहे.

नागाव येथील एका ट्रान्स्पोर्ट कंपनीत ड्रायव्हर म्हणून सागर पाटील काम करतो. अल्पवीयन मुलीला शाळेला ये-जा करताना वाटेत अडवून माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्याशी लग्न कर, असे म्हणून त्रास देत असे.   ऑगस्टमध्ये त्या मुलीला शाळेच्या वाटेत अडवून जीवे मारण्याची धमकी देत आपल्या मोटरसायकलवरून पन्हाळा येथे नेउन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर वारंवार तो त्रास देवू लागला त्यामुळे तिने हा प्रकार बहिण व आईला सांगितला. याबाबत सागरला समजावले, मात्र तो त्रास देतच राहिला. त्यामुळे त्याच्याविरूध्द मुलीच्या आईने गुन्हा दाखल केला.