Thu, Aug 22, 2019 10:15होमपेज › Kolhapur › दिराकडून अत्याचार, पतीकडून मारहाण

दिराकडून अत्याचार, पतीकडून मारहाण

Published On: Mar 03 2018 1:49AM | Last Updated: Mar 03 2018 1:02AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

दिराकडून वारंवार होणारा अत्याचार आणि पतीकडून होणार्‍या मारहाणीला कंटाळून विवाहितेने दोघांविरोधात शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली. याप्रकरणी दीर रमजान व पती अली अकबर (दोघे रा. रुईकर कॉलनी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेला दोघांकडून जबरी मारहाण झाल्याने तिच्यावर सध्या शासकीय इस्पितळात उपचार करण्यात आले. 

पीडितेचा विवाह अली अकबर याच्याशी झाला. लग्नानंतर अली अकबर कामाच्या शोधात कोल्हापुरात आला. त्याच्यासोबत त्याचा भाऊही होता. या विवाहितेच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्या दिराने वारंवार अत्याचार केला. तसेच याची माहिती पीडितेने पतीला दिली असता तिलाच मारहाण करण्यात आली. 

मारहाणीत पीडितेच्या चेहर्‍याला, मानेला गंभीर इजा झाली आहे. तिला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. भीतीपोटी तिने सुरुवातीला तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ 
केली. 

पण, डॉक्टर विजय गाडवे, पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी विश्‍वासात घेऊन तिला माहिती विचारली असता तिने सर्व प्रकार कथन केला. दिराकडून होणार्‍या किळसवाण्या प्रकाराला कंटाळून तिने यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे तपासात पुढे आले आहे. या 
घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला.