Tue, Nov 20, 2018 01:14होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : 'त्या' पोलिसपाटलावर बलात्काराचा गुन्हा नोंद

कोल्‍हापूर : 'त्या' पोलिसपाटलावर बलात्काराचा गुन्हा नोंद

Published On: Jun 22 2018 2:08AM | Last Updated: Jun 22 2018 1:51AMजयसिंगपूर : प्रतिनिधी

कवठेेसार येथील अल्पवयीन मागासवर्गीय मुलीस गैरकृत्य करण्याच्या इराद्याने पळवून नेलेल्या पोलिसपाटील नंदकुमार पाटील याच्यावर भादंविस कलम 376 (2) (आय) नुसार बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, पाटील अद्याप न सापडल्याने पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी मोहीम गतिमान केली आहे.

मुलीच्या भावाने फिर्याद दिल्यानंतर या संशयित पोलिस पाटलावर 363 अपहरण व 366(अ) आणि बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियमाप्रमाणे दोन दिवसांपूर्वी गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र, आज त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 29 मे 2018 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलीला गैरकृत्य करण्याच्या इराद्याने पोलिसपाटलाने त्याच्या चारचाकी वाहन (क्र. एम एच 12 बीजी 9822) यातून पळवून नेले होते. तेव्हापासून ती अल्पवयीन   मुलगी बेपत्ता होती. तिचा शोध घेत असताना ती बुधवारी 20 जून रोजी पोलिसांना आढळली. यातील संशयित आरोपी नंदकुमार पाटील व अपहृत मुलगी हे दोघे एकत्रित सहवासात राहिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसे फिर्यादीने जबाबात म्हटले आहे.

मुलीच्या जबाबानंतर...

दरम्यान, पोलिसांनी महिला दक्षता समिती सदस्यांसमोर मुलीचा जबाब घेतला आहे. त्यानुसार पोलिसपाटलावर कलम 376 नुसार बलात्काराचा गुन्हा गुरुवारी नोंद केला आहे.  अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुरेश नलवडे करीत आहेत.