Tue, Jul 23, 2019 04:47होमपेज › Kolhapur › कोल्‍हापुरात विवाहितेवर दिराकडून बलात्‍कार

कोल्‍हापुरात विवाहितेवर दिराकडून बलात्‍कार

Published On: Mar 02 2018 10:38AM | Last Updated: Mar 02 2018 10:38AMकोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन

शहरातील रुईकर कॉलनी परिसरात एकाने सख्‍ख्या भावाच्या पत्‍नीवर बलात्‍कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी पीडित महिलेने दीर रमजान झाकीर हुसेन आगा (वय २४) याच्याविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल केला. पोलिसांनी रमजान आगा व पती अकबर झाकीर हुसेन आगा यांना अटक केली आहे. 

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, रमजान याने असाहय्‍यतेचा फायदा घेत ती घरात एकटी असताना अनेकदा तिच्यावर बलात्‍कार केला. तिने याबाबत पती अली अकबर झाकीर हुसेन आगा (२६) याला सांगितले. पण त्यानेही पत्‍नीची बाजू ऐकून न घेता भावाची बाजू घेतली. तसेच तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणाची कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. 

या शारीरिक व मानसिक छळवणुकीमुळे पीडितीने शाहूपुरी पोलिसांत गुन्‍हा नोंदवला. त्यानुसार पती व दीराला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.