Sat, Sep 22, 2018 01:07होमपेज › Kolhapur › खासदार राजू शेट्टींसह ६९ जणांची निर्दोष मुक्तता 

खासदार राजू शेट्टींसह ६९ जणांची निर्दोष मुक्तता 

Published On: Mar 17 2018 9:49PM | Last Updated: Mar 17 2018 9:49PMजयसिंगपूर : प्रतिनिधी

शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याच्या २९ सप्टेंबर २००७ रोजी वार्षिक सभेवेळी झालेल्या दंगलीच्या गुन्ह्यातून खासदार राजू शेट्टी, आमदारउल्हास पाटील यांच्यासह ६९ जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

वार्षिक सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे कार्यकर्ते आणि कारखाना समर्थकात धुमश्चक्री उडाली होती. तुफान दगडफेक, वाहनांची जाळपोळ, बाचाबाची यामुळे पोलिसांना अश्रुधुराचे नळकांडे फोडून लाठीमार करावा लागला होता. वार्षिक सभा झाल्यानंतर सभेत मागणी केलेल्या थकीत ३८० रुपये ऊस बिलाचा प्रश्न चिघळला होता. दोन्ही गटात राडा झाला होता.

पोलिसांनी  तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार राजू शेट्टी, स्वाभिमानीचे कार्यकर्ते व शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांच्यासह भगवान काटे, सावकर मादनाईक अशा ६९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आज शनिवारी सत्र न्यायालयात अंतिम सुनावणी होऊन सर्वांची निर्दोष मुक्तता झाली.
 

Tags : raju shetti, 69 persons, acquitted, shirol, datta sugar factory, annual meeting, kolhapur news