Mon, May 27, 2019 06:41होमपेज › Kolhapur › राजर्षी शाहूंचे कार्य आजही प्रशासनासाठी प्रेरणादायी

राजर्षी शाहूंचे कार्य आजही प्रशासनासाठी प्रेरणादायी

Published On: Jul 29 2018 1:22AM | Last Updated: Jul 28 2018 11:22PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहूंनी शंभर वर्षांपूर्वी राबविलेली राजवट आणि केलेले लोकोपयोगी कार्य आजही प्रशासनासाठी आदर्श आहे. प्रशासन यंत्रणा कशी चालवावी यासाठी शाहूंनी काढलेले आज्ञापत्र मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांनी केले. 

लोकराजा फोरम तर्फे ‘राजर्षी’ या शाहू महाराज यांच्या जीवनावरील चित्रमय पुस्तकाचे प्रकाशन आणि ुुु. श्रेज्ञीरक्षरषेीरा.ेीस या वेबसाईटचे प्रकाशन शनिवारी झाले. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती होते. 

यावेळी महापौर शोभा बोंद्रे, आ. हेमंत टकले, आ. हसन मुश्रीफ, खा. धनंजय महाडिक, माजी खा. कलाप्पाणा आवाडे, निवेदिता माने, माजी आ. प्रकाश आवाडे, के.पी. पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक, लेखक उमेश सूर्यवंशी, चित्रकार विजय चोकाककर, अध्यक्ष दीपक दळवी, संदीप बोरगावकर, सोमनाथ माने, नितीन देसाई, विकास पाटील, नीलेश जाधव, नागराज सोळंकी, आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर व शाहूप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.