Fri, Apr 26, 2019 19:20होमपेज › Kolhapur › रेल्वे पुलाला धडक देणारा ट्रेलर पकडला

रेल्वे पुलाला धडक देणारा ट्रेलर पकडला

Published On: Mar 05 2018 1:42AM | Last Updated: Mar 05 2018 12:05AMकोल्हापूर : प्रतिनिधी

उदगावनजीक रेल्वे ब्रीजला धडक देऊन पसार झालेल्या ट्रेलर चालकासह  रेल्वे पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतला. टी. क्रिस्तोफर (रा. कन्याकुमारी, तामिळनाडू) असे त्याचे नाव आहे. शनिवारी मध्यरात्री ट्रेलरने दिलेल्या धडकेत पुलाचे मोठे नुकसान झाले होते. त्याचा आठ तासात रेल्वे पोलिसांनी शोध घेतला. 

सांगली - कोल्हापूर मार्गावरील उदगाव- अंकली रेल्वे पुलाला संरक्षित हाईटगेज पाडून ट्रेलरने धडक दिली. यामध्ये पुलाचा सुमारे दीड फूट लोखंडी भाग सरकला होता. शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मालगाडी चालकाच्या निदर्शनास हा प्रकार आल्याने मोठा अनर्थ टळला.  रेल्वे सुरक्षा बलाचे अधीक्षक डी. विकास यांनी तीन पथके रवाना केली होती. तसेच पुलाचे काम तातडीने सुरू करण्यात आले होते.