Thu, Nov 15, 2018 01:07होमपेज › Kolhapur › शहरातील डॉक्टर्सवर आयकर विभागाचे छापे

शहरातील डॉक्टर्सवर आयकर विभागाचे छापे

Published On: Dec 06 2017 9:21PM | Last Updated: Dec 06 2017 9:21PM

बुकमार्क करा

कोल्हापूर  : प्रतिनिधी

शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील चार नामांकित डॉक्टरांच्यावर आयकर विभागाने बुधवारी सकाळी दवाखाने व निवासस्थानावर एकाच वेळी छापे टाकल्याचे समजते.  या कारवाईने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

आयकर विभागाचे चाळीसहून अधिकारी व कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. कावळा नाका, व्हीनस कॉर्नर, राजारामपूरी, व क्रशर चौकातील डॉक्टरांचा यात समावेश आहे. या सर्व दवाखान्यांचे दैनंदिन कामकाज सुरु ठेवून ही कारवाई करण्यात आली. आयकर कर्मचार्‍यांनी संबंधीत दवाखान्या मधील आर्थिक व्यवहारांची माहिती घेतली. पेशंटकडून घेतले जाणारे पैसे त्यांच्या नोंदी तपासण्याचे काम सुरु असल्याचे समजते. 

या दवाखान्यांनी गेल्या सहा वर्षात किती आयकर भरला आहे, संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम दिवसभर सुरु होते. वैद्यकीय क्षेत्राव्यतिरीक्त अनेक हॉस्पीटलची स्वत:ची मेडीकल दुकाने आहेत. त्यांच्याकडील आर्थिक व्यवहरांची माहिती घेण्यसाठी सर्व जुनी बिले तपासण्याचे काम सुरु आहे. हॉस्पीटलबरोबरच जमीन, सोने, शेअर्स मधील गुंतवणूकीची माहिती घेण्याचे काम सुरु आहे.