Sun, Mar 24, 2019 06:14होमपेज › Kolhapur › हातकणंगलेत लॉजवर छापा; 21 जोडप्यांना अटक

हातकणंगलेत लॉजवर छापा; 21 जोडप्यांना अटक

Published On: Aug 08 2018 1:49AM | Last Updated: Aug 08 2018 12:04AMहातकणंगले : प्रतिनिधी 

हातकणंगले येथील हॉटेल अन्नपूर्णा आणि न्यू अन्नपूर्णा लॉजिंगवर पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक सूर्यवंशी यांनी रविवार सायंकाळी छापा टाकून 21 जोडप्यांना रंगेहाथ पकडून पोलिस ठाण्यामध्ये  ठेवले होते. या 21 जोडप्यांमध्ये 18 कॉलेज युवतींचा समावेश होता. 

या 21 जोडप्यांवर रविवारी रात्री उशिरापर्यंत पोलिस कारवाई सुरू होती. पालकांना आणि संबंधित कॉलेजच्या प्रशासनाला पोलिस ठाण्यात बोलावून अर्थपूर्ण वाटाघाटी करून पोलिस कारवाईऐवजी जुजबी कारवाई करून मालकासह सर्वांनाच सोडून दिल्यामुळे तालुक्यात पोलिस कारवाईबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच पोलिस अधीक्षक यांच्या परवानगीशिवाय छापा टाकला व तो परस्पर का मिटवला, याचीही चर्चा सुरू आहे.

हातकणंगले येथे सांगली कोल्हापूर रस्त्यानजीक माने (सरकार ) बंधूचे अन्नपूर्णा व न्यू अन्नपूर्ण नावाने दोन हॉटेल सुरू आहेत. रस्त्यानजीक असलेल्या या हॉटेलमध्ये सतत वर्दळ असते. वाहने सरळ हॉटेलमधून पाठीमागे जाण्याची सोय असल्याने नेमके काय चालू आहे हे समजून येत नाही. या ठिकाणी स्त्रियांसह कॉलेज युवतींचा नेहमी वावर असतो, असे परिसरात बोलले जाते.

तथापि,   हॉटेलमध्ये काळे धंदे सुरू असल्याची खबर सहायक पोलिस निरीक्षक सूर्यवंशी यांना मिळाली. त्यानुसार सहकार्याच्या समवेत छापा टाकली असता, त्यांना 21 जोडपी मिळून आली. यामध्ये तीन प्रौढ तर 18 युवक-युवतींचा समावेश आहे.