Thu, May 28, 2020 10:41होमपेज › Kolhapur › रग्गेडियन मॅरेथॉन खेळ विकासासाठी पोषक

रग्गेडियन मॅरेथॉन खेळ विकासासाठी पोषक

Published On: Jan 12 2018 1:52AM | Last Updated: Jan 13 2018 5:13PM

बुकमार्क करा
कोल्हापूर  : क्रीडा प्रतिनिधी 

रग्गेडियन मॅरेथॉन आयोजित डीवायपी कोल्हापूर रन अल्ट्रा मॅरॉथॉन स्पर्धेमुळे शालेय विद्यार्थ्यांत विविध खेळांबद्दल आवड निर्माण होऊन खेळ विकासासाठी पोषक वातावरण निर्माण होत असल्याच्या प्रतिक्रिया विविध शाळा-महाविद्यालयांच्या संचालक, प्राचार्यांनी व्यक्‍त केल्या.

सेंट झेवियर्सचे प्रिन्सिपल फादर जेम्स थोरात एस. जे. यांनी आम्ही सिल्व्हर ज्युबली वर्ष यावर्षी साजरे करीत आहोत. या वर्षात आम्हाला या मॅरेथॉनमध्ये पालक व विद्यार्थ्यांसह सहभागी होता येत आहे, हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. आदर्श विद्यालयाचे प्रिन्सिपल डी. एस. घुगरे यांनी आजची तरुणाई भरकटलेली आहे. त्यांना एकत्र आणण्यासाठी अशा मॅरेथॉन स्पर्धा एक प्लॅटफॉर्म आहे. चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशनचे चेअरमन भरत खराटे यांनी फिटनेसचा मूलमंत्र देणारी मॅरेथॉन स्पर्धा रग्गेडियन संस्थेने आयोजित केली आहे.ज्यामध्ये आमचे एक हजार विद्यार्थी आपल्या पालकांसहित सहभागी होत असल्याचे सांगितले. माईसाहेब बावडेकर विद्यालयाचे व्हाईस प्रेसिडेंट निलराजे पंडित यांनी आजच्या काळात फिटनेसचे महत्त्व मुलांना व पालकांना समजणे गरजेचे आहे. शिक्षणाबरोबर फिटनेस आवश्यक असल्याने आम्ही आमच्या मुलांसमवेत स्पर्धेत सहभागी होत असल्याचे सांगितले. स्पर्धेविषयी बोलताना कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या ट्रस्टी शोभा तावडे यांनी आम्ही या स्पर्धेत रन फॉर सेफ्टी हे ध्येय समोर ठेवून पळणार असल्याचे सांगितले आहे. 

दरम्यान, 11 फेब्रुवारी रोजी कोल्हापुरात होणार्‍या मॅरेथॉनमध्ये 15 हजार स्पर्धक सहभागी होत आहेत. स्पर्धेसाठी डीवायपी ग्रुप हे टायटल स्पॉन्सर आहेत तर कॉसमॉस बँक गोल्ड स्पॉन्सर, फॉर्च्युन शहा ग्रुप सिल्व्हर स्पॉन्सर, जे. के.  ग्रुप व कोरगावकर पेट्रोल पंप व मनपा आदींच्या सहकार्याने या स्पर्धा होत आहे. हॉट फ्रायडे टॉल्क्स हे लाईफस्टाईल पार्टनर असून दै.‘पुढारी’ असोसिएट पार्टनर आणि टोमॅटो एफ. एम. रेडिओ पार्टनर आहेत. नावनोंदणीसाठी रग्गेडियन ऑफिस अमात्य टॉवर, चौथा मजला दाभोळकर कॉर्नर किंवा अधिक माहितीसाठी 9623688883 किंवा 8806226600 या क्रमांकावर किंवा www.kolhapurrun.com /www.ruggedian.com या संकेतस्थळावर अर्ज भरावेत.