होमपेज › Kolhapur › रग्गेडियन मॅरेथॉनअंतर्गत हेल्थ एक्स्पो

रग्गेडियन मॅरेथॉनअंतर्गत हेल्थ एक्स्पो

Published On: Feb 05 2018 1:30AM | Last Updated: Feb 05 2018 12:34AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

क्रीडानगरी कोल्हापुरात 11 फेब्रुवारी रोजी होणार्‍या “हिट 24 ग्रुप प्रेझेंटस् डीवायपी रग्गेडियन कोल्हापूर रन अल्ट्रा मॅरेथॉन 2018’’ स्पर्धा अवघ्या आठवड्यावर आली आहे. मॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील हजारो स्पर्धकांनी आपला सहभाग निश्‍चित केला आहे. अनेकजण सहकुटुंब-मित्र परिवारासह मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत. दरम्यान, खेळाडूंच्या फिटनेससाठी रग्गेडियन क्लबतर्फे हेल्थ एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार (दि. 9) ते शनिवार  (दि. 10)  या कालावधीत सेंट झेवियर्स हायस्कूलच्या प्रांगणात हा उपक्रम होणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार्‍या एक्स्पोवेळी तज्ज्ञांचे मार्गदर्शन यासह विविध मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध खाद्यपदार्थ व उत्पादनांचे स्टॉल या एक्स्पोमध्ये उपलब्ध असणार आहेत. तसेच अ‍ॅडव्हेंचर उपक्रम व खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

दैनिक ‘पुढारी’ मॅरेथॉनचे असोसिएट पार्टनर असून, टोमॅटो एफ.एम. रेडिओ पार्टनर आहेत. हिट 24 ग्रुप प्रेझेंटिंग पार्टनर, तर डीवायपी गु्रप टायटल स्पॉन्सरर आहेत. कॉसमॉस बँक गोल्ड स्पॉन्सर, फॉर्च्युन शहा गु्रप व एस.जी.यू. सिल्व्हर स्पॉन्सर, जे. के. गु्रप व्हेंचर, कोरगावकर पेट्रोल पंप फ्युअल पार्टनर, कोंडुसकर ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल पार्टनर, हॉटेल थ्री लिव्ह हॉस्पिटॅलिटी पार्टनर आणि हॉट फ्रायडे टॉक्स लाईफस्टाईल पार्टनर, इन्स्टिन्क्ट मीडिया डिजिटल पार्टनर आणि कोल्हापूर मनपाच्या सहकार्याने ही मॅरेथॉन होत आहे.  

मॅरेथॉनची ठळक वैशिष्ट्ये
रग्गेडियन कोल्हापूर रन भारतातील सर्वात पहिली ऑन सिटी रोड अल्ट्रा मॅरेथॉन आहे. कोल्हापुरातील सर्वात मोठी मॅरेथॉन असून, देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात यात स्पर्धक सहभागी होणार आहेत. भारतातील एकमेव मॅरेथॉन ज्यांचे सर्व पेसर हे आयर्नमॅन फिनिशर्स आहेत. कोल्हापुरात पहिल्यांदाच टाईम चीप तंत्रज्ञान, फिनिशर्स मेडल, ऑन रूट मनोरंजन, पेसरची संकल्पना, एक्स्पो, अ‍ॅम्बेसिडर संकल्पना, ऑनलाईन नोंदणी यासारख्या संकल्पना रग्गेडियनने आणल्या आहेत. महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग रग्गेडियनच्या उपक्रमांसाठी कायम लाभतो. रग्गेडियन कोल्हापूर रन, तसेच शिवाजी ट्रेल मान्सून रेस, रग्गेडियन ऑब्स्टॅकल रेस, रग्गेड सह्याद्री हे भारतातील अग्रेसर उपक्रम आहेत. 12 हजारहून अधिक लोकांचा सहभाग या कोल्हापूर रन मॅरेथॉनसाठी लाभला आहे. 
मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांचा सहभाग वाढतच आहे. लवकरच नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात येणार आहे. मॅरेथॉन सहभागासाठी www.kolhapurrun.com/www.ruggedian.com  या संकेतस्थळावरून नावनोंदणी करणे आवश्यक आहे. 

याशिवाय अधिक माहितीसाठी रग्गेडियन स्टोअर्स, डीवायपी मॉल तिसरा मजला, डी. टी. कारेकर सराफ (घाटी दरवाजा) अंबाबाई मंदिरसमोर, रग्गेडियन ऑफिस अमात्य टॉवर चौथा मजला, दाभोळकर कॉर्नर किंवा रग्गेडियन स्टोअर्स डीवायपी मॉल तिसरा मजला कोल्हापूर आदी ठिकाणी सुरू असून, या ठिकाणी किंवा 9623688881, 8806226600/ 9623688886 या क्रमांकांवर संपर्क साधावा.