Wed, Nov 21, 2018 13:17होमपेज › Kolhapur › रग्बी : कोल्हापूरच्या संघांचे यश

रग्बी : कोल्हापूरच्या संघांचे यश

Published On: Jan 13 2018 1:12AM | Last Updated: Jan 12 2018 11:41PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि ठाणे जिल्हा संघटनेच्या वतीने आयोजित सब ज्युनिअर राज्य अजिंक्यपद रग्बी स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याच्या संघांनी यशस्वी कामगिरी केली. मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकाविले तर मुलींनी तृतीय क्रमांक मिळविला. बक्षीस समारंभ अंबरनाथ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. मनीषा वाळेकर व डॉ. श्रीकृष्ण पाडगावकर यांच्या हस्ते झाले. 

मुलांच्या संघात संचित पाटील, विनायक पाटील, अवधूत पोवार, विश्‍वजित सुतार, प्रथमेश शिंदे, कौशल पाटील, आदित्य शिंदे, स्वप्निल शिंदे, अमृत पाटील, पियुष कदम, करण पाटील, नागेश दिवसे यांचा समावेश आहे. 

मुलींच्या संघात वैष्णवी पाटील, ऋतुजा फाटक, दिक्षा कांबळे, अस्मिता भोसले, राजनंदिनी पाटील, वैष्णवी चव्हाण, प्राची पाटील, अपूर्वा माने, आरती पाटील, गायत्री कळके, तेजस्विनी पाटील, स्वाती माळी. 
सर्वांना प्रशिक्षक दीपक पाटील यांचे मार्गदर्शन आणि खा. संभाजीराजे, माजी आ. मालोजीराजे, अध्यक्ष प्रा. अमर सासने यांचे प्रोत्साहन लाभले.