Tue, Jul 23, 2019 06:17होमपेज › Kolhapur › पर्यटनाचे ‘महाद्वार’ झाले खुले

पर्यटनाचे ‘महाद्वार’ झाले खुले

Published On: Sep 09 2018 2:12AM | Last Updated: Sep 09 2018 2:12AMकोल्हापूर : प्रतिनिधी

धावपळीच्या जीवनात काही काळाची सुखद विश्रांती मिळावी यासाठी पर्यटन काळाची गरज आहे. पर्यटनासाठी सर्वत्र फिरण्याची तीव्र इच्छा असते;  पण जायचे कोठे? बजेटमध्ये बसेल का?  इथपासूनचे अनेक प्रश्‍न निर्माण होतात. या प्रश्‍नांची उत्तरे देण्याबरोबरच मनमुुराद पर्यटनाचा आनंद देणार्‍या ‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’च्या प्रदर्शनाला शनिवारी शानदार प्रारंभ झाला.

हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसूदन हॉलमध्ये  प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक ‘सफर टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स’चे  संचालक रवी शर्मा, सहप्रायोजक ‘क्‍वेस्ट टूर्स’चे संचालक प्रसाद पाटकर, दैनिक ‘पुढारी’चे समूह कार्यकारी संपादक सुरेश पवार, सहायक सरव्यवस्थापक (अ‍ॅडमिन) राजेंद्र मांडवकर, रिजनल मॅनेजर शशिकांत पोवार, कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे जनसंपर्क प्रमुख अरुण चोपदार, माजी उपाध्यक्ष उमेश राऊत  यांच्यासह प्रदर्शनात सहभागी सर्व टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. बसंत-बहार टॉकीज रोडवरील हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसूदन हॉलमध्ये हे प्रदर्शन दि. 8 ते 10 सप्टेंबर या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत खुले राहणार आहे. 

परिपूर्ण माहितीचे दालन

प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलवर देश-विदेशासह विविध ऋतू, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, कृषी अशा विविध प्रकारच्या पर्यटनांची इत्थंभूत माहिती उपलब्ध आहे. पर्यटनस्थळांचा इतिहास, भुगोल, पर्यावरण यासह नकाशा, रेल्वे, विमान, एस.टी., स्थानिक वाहतूक व्यवस्था व त्यांचे टाईमटेबल, पर्यटन पॅकेजीस, विविध ऑफर्स आदींची माहिती प्रत्येक स्टॉलवरील प्रतिनिधींकडून आपुलकीच्या सेवेतून दिली जात आहे.  तीन दिवस चालणार्‍या या प्रदर्शनात 25 हून अधिक स्थानिक पर्यटन संस्थांसह जगप्रसिद्ध विविध संस्था, नामवंत टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्या व विविध सवलती पर्यटनप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहेत.

प्रदर्शनात नामवंत टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून देश-विदेशातील सहलींवर सूट देण्यात आली आहे. याचबरोबर छोट्या-मोठ्या कुटुंबांसाठी, महिला बचत गट, ज्येष्ठ मंडळी यांच्यासाठी विशेष पॅकेजीसही उपलब्ध आहे. पर्यटनप्रेमींनी या प्र

दर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

सहभागी संस्था  

सफर टूर्स अँड ट्रॅव्हल्स, क्वेस्ट टूर्स, कॉक्स अँड किंग, थॉमस कुक, कॅप्टन नीलेश गायकवाड,  निम हॉलिडेज, गगन टूर्स, विहार ट्रॅव्हल्स, केसरी, मातृभूमी दर्शन टूर्स, चौधरी यात्रा कंपनी, हनी हॉलिडेज, भोसले टूर्स अँड ट्रॅव्हल्स, हितस्वी वर्ल्ड हॉलिडेज, कोंडुस्कर हॉलिडेज, बी.जी. टूर्स, एक्सकर्शीया टूर्स, ट्रॅव्हल टूर्स, हॉलिडे स्टोअर इंडिया, वैष्णवी टूर्स, गार्गी टूर्स, अ हेवन हॉलिडे, साई श्रद्धा टूर्स, फिरू या डॉट कॉम, बालाजी पिकनिक टेबल, कॅरीबॅग.