Sat, Apr 20, 2019 15:52होमपेज › Kolhapur › राजू गुरवना चारचाकी; गीता काळेंना दुचाकी

राजू गुरवना चारचाकी; गीता काळेंना दुचाकी

Published On: Mar 01 2018 1:38AM | Last Updated: Mar 01 2018 12:50AMकोल्हापूर : प्रतिनिधी

प्रत्येक क्षणाला वाढणारी उत्सुकता आणि टाळ्या, शिट्ट्यांच्या दणदणाटात खचाखच भरलेल्या शाहू स्मारक भवनात दैनिक ‘पुढारी’ आयोजित थ्री स्टार धूमधडाका वाचक बक्षीस आणि दसरा-दिवाळी शॉपिंग उत्सव 2017 या योजनांची सोडत काढण्यात आली. काळम्मावाडी वसाहत, कागल येथील राजू तुकाराम गुरव हे दसरा-दिवाळी शॉपिंग उत्सव योजनेतील पहिल्या क्रमांकाच्या कारचे, तर ‘थ्री स्टार धूमधडाका वाचक योजने’तील पहिल्या क्रमांकाच्या होंडा क्लिक गीअरलेस बाईकच्या मानकरी गीता शाहू काळे (रा. विक्रमनगर, कोल्हापूर) ठरल्या. उत्कंठावर्धक आणि तितक्याच जल्लोषी वातावरणात हा सोहळा रंगला. 

वाचकांशी आपुलकी आणि जिव्हाळ्याचे नाते पिढ्यान्पिढ्या जपणार्‍या दैनिक ‘पुढारी’ने वाचकांवर बक्षिसांचा वर्षाव केला. कार, मोटारसायकल, सोने आदी विविध प्रकारच्या बक्षिसांची भाग्यवान भेट ‘पुढारी’ने वाचकांना दिली. या सोहळ्याला सकाळपासूनच गर्दी झाली होती. सकाळी साडेदहाच्या सुमारास शाहू स्मारक भवन वाचकांच्या गर्दीने भरून गेले होते. जागा मिळेल तिथे वाचक थांबले होते. वाचकांच्या अलोट गर्दीत सकाळी 11 वाजता मुख्य सोडतीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सोडतीचा कार्यक्रम सुरू होताच, सभागृहात उत्कंठा पसरली. प्रत्येक कूपन काढताना सार्‍यांच्या चेहर्‍यांवर उत्सुकता जाणवत होती. जसजसे कूपन काढले जात होते, भाग्यवान विजेत्यांची नावे जाहीर केली जात होती, तसतसे सभागृह टाळ्या आणि शिट्ट्यांनी दणाणून जात होते.

 महापौर स्वाती यवलुजे, करवीरचे पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, भारत डेअरीचे हितेशभाई मेहता, चाटे शिक्षण समूहाचे संचालक प्रा. डॉ. भारत खराटे, क्रिडाईचे अध्यक्ष महेश यादव, करवीर क्रिएशनचे विनित नैनवाणी, लक्ष्मी सेल्सचे अजित पाटील, व्यंकटेश्‍वरा गारमेंट्सचे सतीश माने, महेंद्र ज्वेलर्सचे भरत ओसवाल, के. आर. टीव्हीएसचे अर्जुन सोनवणे, ‘आसमा’चे अध्यक्ष संजय रणदिवे, ‘फेम’चे अध्यक्ष अमर पाटील, कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे सचिव माणिक जैन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी दैनिक ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, सहायक सरव्यवस्थापक राजेंद्र मांडवकर, विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पोवार, वितरण विभागाचे उपसरव्यवस्थापक मिलिंद उटगीकर यांनी  पाहुण्यांचे स्वागत केले.

दसरा दिवाळी सणाच्या खरेदीसोबत लाखो रुपयांच्या बक्षिसांची बरसात करणार्‍या ‘पुढारी शॉपिंग उत्सव’ योजनेचा लकी ड्रॉ सुरुवातीला काढण्यात आला. योजनेतील प्रत्येक कूपन काढताना वाचकांची उत्सुकता वाढत होती. चारचाकी, दुचाकी, एक तोळा सोने या बक्षिसांचे मानकरी  ठरणार्‍या भाग्यवानाबाबत उत्कंठा वाढत होती. ‘पुढारी शॉपिंग उत्सव’ योजनेतील पहिल्या क्रमांकाचे बक्षीस महापौर यवलुजे यांच्या हस्ते काढण्यात आले. त्यानंतर सूरज गुरव यांच्या हस्ते दुसर्‍या क्रमांकाच्या दुचाकीसाठी कूपन काढण्यात आले. तिसर्‍या क्रमांकाच्या एक तोळा सोन्याचे कूपन अजित पाटील यांच्या हस्ते काढण्यात आले. बक्षीस क्रमांक चारच्या 32 इंची एलईडी टीव्हीसाठी सतीश माने आणि भरत ओसवाल यांच्या हस्ते ड्रॉ काढण्यात आला. पाचव्या क्रमांकाच्या फ्रिज बक्षिसासाठी अमर पाटील आणि संजय रणदिवे यांच्या हस्ते ड्रॉ काढण्यात आला. कूलर बक्षिसासाठी महेश यादव, प्रा. भारत खराटे, अमर पाटील, हितेशभाई मेहता, माणिक जैन यांच्या हस्ते ड्रॉ काढण्यात आला. शेवटची सातव्या बक्षिसाच्या स्मार्ट फोनसाठी महापौर स्वाती यवलुजे, अर्जुन सोनवणे, विनित नैनवाणी, अजित पाटील यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला. 

या योजनेला राजाकाका ई-मॉल मुख्य प्रायोजक, चकोते ग्रुपची श्री गणेश बेकरी नांदणी प्रा. लि., आणि श्री वारणा सह. बँक लि., वारणानगर सहयोगी प्रायोजक, तर सहप्रायोजक म्हणून लक्ष्मी सोलार पंप, व्यंकटेश्‍वरा गारमेंट्स, एसएस कम्युनिकेशन अँड सर्व्हिसेस प्रा. लि., स्फूर्ती, हिरापन्ना ई-मॉल, करवीर क्रिएशन्स, सीएमएम अरेना मेगा स्टोअर यांचे सहकार्य लाभले.

शॉपिंग उत्सव योजनेनंतर थ्री स्टार धूमधडाका योजनेची सोडत काढण्यात आली. पहिल्या क्रमांकाच्या होंडा क्लिक गीअरलेस बाईकसाठी सूरज गुरव यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला. दुसर्‍या क्रमांकाच्या राईस कूकर्सच्या प्रा. भारत खराटे, विनित नैनवाणी, संजय रणदिवे यांच्या हस्ते गॅस स्टोव्हज्साठी भरत ओसवाल, सतीश माने, स्मार्ट फोनसाठी हितेश मेहता, हेल्मेट्ससाठी महेश यादव, अमर पाटील यांनी भाग्यवान कूपन काढली. यानंतर चांदीची नाणी, बँ्रडेड इलेक्ट्रिक आयर्न या बक्षिसांसाठी मान्यवरांनी कूपन काढले. 

शॉपिंग उत्सव योजनेतील भाग्यवान विजेते

शॉपिंग उत्सव योजनेतील दुसर्‍या क्रमांकाच्या मोटारसायकलच्या मानकरी वाडीरत्नागिरी (ता. पन्हाळा) येथील पूजा अशोक सांगळे या ठरल्या. लाटवडे (ता. हातकणंगले) येथील मानसी मानसिंग वाघमारे या एक तोळे सोन्याच्या तिसर्‍या क्रमाकांच्या बक्षिसाच्या मानकरी ठरल्या. चौथ्या क्रमाकांच्या 32 इंची एलईडी टीव्हीचे वेदिका आदमापुरे व तेजस पाटील हे विजेतेे ठरले. रेफ्रिजेटर या पाचव्या क्रमांकाच्या बक्षिसाचे संतोष सूर्यवंशी व राहुल बारसकर हे मानकरी ठरले.

थ्री स्टार वाचक धूमधडाका वाचक बक्षीस योजनेचे भाग्यवान विजेते

दुसर्‍या क्रमाकांच्या इलेक्ट्रिक राईस कूकरचे सौ. उमा विकास फडतारे (रा. प्लॉट नं.23, अ, सूर्यवंशी कॉलनी, साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर), सौ. अर्चना आप्पासाो भोसले (रा. उचगाव ता. करवीर), शंकर शामराव मोरे, (रा. 5/6 दत्त मंदिर, जाधववाडी, ई वॉर्ड कोल्हापूर), सौ. प्रज्ञा विनायक प्रभूझाट्ये (रा. घोरपडे गल्ली, शाहूपुरी) व राजेंद्र गजानन आयरेकर (रा. बालिंगा ता. करवीर) हे मानकरी ठरले. 
तिसर्‍या क्रमाकांच्या हँडी सिंगल बर्नर गॅसचे सौ. पुष्पा शरदराव संकपाळ (रा. प्लॉट नं. 29, भारत हौसिंग सोसायटी, राजारामपुरी 8 वी गल्ली), रवींद्र नारायण माने (रा. गणेश गल्ली क्रं.1, मंगेश्‍वर कॉलनी उचगाव), विजय शामराव चव्हाण (रा. घर नं. 542, ई वॉर्ड, विचारे माळ, कदमवाडी रोड), सौ. सुलोचना मधुकर निकम (रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले), सारिका अमर वडाम (रा. 602 नॉर्थ आय व्हिल्यामेंट, महावीर गार्डनजवळ, कोल्हापूर), अनिल देवेंद्र शिंदे (रा. सर्व्हे नं.710/11 म्हाडा कॉलनी, रूम नं.74 हॉकी, स्टेडियमसमोर, कोल्हापूर) व जीवनराव बाबासाहेब मुधोळकर (2829 ए/11, बी वॉर्ड, मंडलिक वसाहत, कोल्हापूर) हे मानकरी ठरले. 

चौथ्या क्रमाकांच्या जिओ वायफायचे महावीर बापू मासुले (फुलेवाडी, दुसरा बसस्टॉप, प्लॉट नंबर 57), अश्‍विनी विशाल गडकरी (1341 ई वार्ड, शाहूनगर शामनिवास, राजारामपुरी), मनीषा अविनाश मोहिते (1342, बी बॉर्ड, दैवज्ञ बोर्डिंगनजीक, मंगळवार पेठ), आयेशा रियाज मेस्त्री (ई वॉर्ड, यादवनगर मेनरोड, कोल्हापूर), श्रीकांत तुकाराम खटाळे (शिरोली पु., ता. हातकणंगले), स्मिता संतोष पिसाळ (2354, ई वॉर्ड, रणदिवे गल्ली, कसबा बावडा), मीनाक्षी अप्पासो लोहार (समता कॉलनी, टेंबलाईवाडी), रूपेश परशुराम देवूडकर (870/ए, ई वॉर्ड, रेणुकानगर, लाईनबझार), शिवाजी बाबुराव काटकर (आंबेवाडी, ता. करवीर), उषा महावीर कागले (एस-3, रजनी टेरेसेस, 2021 ई वॉर्ड, सहावी गल्ली, राजारामपुरी), रूपाली श्रीकांत सुतार (प्लॉट नंबर 6/1 विश्‍वास कॉलनी, सुभाषनगर) हे मानकरी ठरले.

पाचव्याक्रमांकाच्या हेल्मेटचे प्रियांका कुबेर वाघपट्टे (निगवे दु. कुशिरे रोड, आडसूळ मळा, ता. करवीर), नुरमहमंद अब्दुल शेख (घर नं. 2277, सी वॉर्ड, सोमवार पेठ), विशाल देवदास कांबळे (शिंगणापूर, गणेशवाडी, ता. करवीर), सुधाकर धनवडे (टोप, ता. हातकणंगले), अनिता संजय शेंडे (एसटी कॉलनी, ताराबाई पार्क), शालन दिलीप कुंभार (613 डी वॉर्ड, कुंभार गल्ली), गणशे रवींद्र हिंडसगिरी (प्लॉट नंबर 45, गणेश पार्क, कदमवाडी), उमेश हरिलाल छाकैया (प्लॉट नंबर 447/1, स्टेट बँकेसमोर, शिवाजी उद्यमनगर), महादेव सिद्धाप्पा मगदूम (अहिल्याबाई होळकरनगर, फुलेवाडी), अशोक यशवंतराव सूर्यवंशी (राजलक्ष्मीनगर, देवकर पाणंद), सुनील बंडोपंत हुजरे (धोत्री तालमीच्या मागे, दुधाळी), सोहेल इकबाल देसाई (मंगेश्‍वर गल्ली, मेनरोड, उचगाव), मुबारक दादासो देसाई (2105 डी वॉर्ड, शुक्रवार पेठ, पंचगंगा हॉस्पिटलजवळ, फडणीस बोळ), प्रकाश भरमण्णा नागराळे (925 बी, शुश्रूषानगर, देवकर पाणंद), राजवर्धन रवींद्र जोशी (2811, बी वॉर्ड, मंगेशकरनगर), मीनल दत्तराज चौगले (शिंगणापूर), प्रणाली तानाजी पोवाळकर (आडवे गल्ली, कसबा बावडा), नंदा महादेव रेडकर (ई वॉर्ड, छावा चौक, लाईन बझार), दिलीप बापू पाटोळे (13 ई, रुईकर कॉलनी), शुभांगी शिवाजी राऊत (शामला अपार्टमेंट, कळंबा रोड), श्रीनिवास रामचंद्र सावंत (1702, डी वॉर्ड, उत्तरेश्‍वर पेठ) हे 
मानकरी ठरले.