होमपेज › Kolhapur › आता प्रतीक्षा पुढारी शॉपिंग फेस्टिव्हलची

आता प्रतीक्षा पुढारी शॉपिंग फेस्टिव्हलची

Published On: Dec 14 2017 2:18AM | Last Updated: Dec 14 2017 12:19AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

दैनिक ‘पुढारी’ आणि टोमॅटो एफ.एम. आयोजित ‘पुढारी शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल’ 22 ते 26 डिसेंबर या कालावधीत आर. व्ही. ग्राऊंड, बावडा रोड, राजहंस प्रिंटिंग प्रेससमोर, नागाळा पार्क येथे हे सर्वांसाठी खुले राहणार आहे. फेस्टिव्हलमध्ये मोजकेच स्टॉल शिल्लक राहिले असून, बुकिंगसाठी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

कोल्हापूरकरांना उत्सुकता लागून राहिलेल्या ‘पुढारी शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल’ला रॉनिक वॉटर हिटर सिस्टिम आणि पितांबरी रुचियाना हे सहप्रायोजक आहेत. मनसोक्‍त खरेदीसोबत येथे नानाविध पदार्थांची रेलचेल असल्याने हे फेस्टिव्हल कोल्हापूरकरांसाठी पर्वणीच असते. नाताळ सण आणि नवीन वर्षाच्या उत्साही वातावरणाचा पुरेपूर आस्वाद लोकांना सहकुटुंब येथे घेता येणार आहे. चमचमीत खाद्यपदार्थांसोबत दर्जेदार कंपन्यांची उत्पादने आणि भरघोस सवलती हे फेस्टिव्हलचे वैशिष्ट्य आहे.

महिला व तरुणींसाठी क्रॉकरी, सौंदर्य प्रसाधने, फॅन्सी ड्रेस, तरुणांसाठी व्यायामाचे साहित्य, तर ज्येष्ठांसाठी आयुर्वेदिक प्रोडक्ट, कपडे आदी बरेच काही फेस्टिव्हलमध्ये असणार आहे. 

गृहोपयोगी वस्तू एकाच छताखाली

कुटुंबासाठी लागणार्‍या गृहोपयोगी वस्तू लोकांना एकाच छताखाली खरेदी करता येणार आहेत. फ्रीज, वॉशिंग मशीन, गॅस शेगडी, लोणची, इन्स्टंट रांगोळी, व्यायामाचे साहित्य, इमेटिशन ज्वेलरी, फॅन्सी ड्रेस, आयुर्वेदिक हेल्थकेअर उत्पादने, सौंदर्य प्रसाधने, मसाल्याचे पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ, प्लास्टिकच्या वस्तू यांचे स्टॉल असतील.

शाकाहारी अन् मांसाहारी पदार्थही शाकाहारी पदार्थांसोबतच मांसाहारी पदार्थांचीही रेलचेल असणार आहे. माशांपासून तयार केलेले विविध पदार्थ असणार आहेत. झणझणीत तांबडा पांढरा-रस्सा, वडा-कोंबडा, कबाब, चिकन लॉलीपॉप, तंदूर फेस्टिव्हलमध्ये असेलच, याशिवाय हैदराबादी, लखनवी बिर्याणीचाही आस्वाद घेता येणार आहे. शाकाहारीमध्ये डोसा, उत्ताप्पा, गोबी मंच्युरियन, भेल, पाणीपुरी, सँडवीच, झुणका-भाकर, व्हेज पुलाव, आइस्क्रिम आदी चमचमीत पदार्थांचे स्टॉलही फेस्टिव्हलमध्ये असणार आहेत. गृहोपयोगी स्टॉल बुकिंगसाठी सनी 9765566413, अमोल 9765566377 आणि प्रदीप 9765566604, तसेच फूड स्टॉलसाठी 8805007724, 8805024242 या मोबाईल क्रमांकांशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.