Wed, Apr 24, 2019 00:21होमपेज › Kolhapur › ‘पुढारी’ प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन

‘पुढारी’ प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन

Published On: Aug 31 2018 1:39AM | Last Updated: Aug 31 2018 12:52AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पुणे शहर आणि परिसरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प एकाच छताखाली पाहण्याची सुवर्णसंधी कोल्हापूरकरांना दै. ‘पुढारी’ पुणे ‘प्रॉपर्टी एक्स्पो-2018’ मध्ये मिळणार आहे. नागरिकांच्या आग्रहास्तव या एक्स्पोचे आयोजन होत असून, यंदा हे प्रदर्शन दि. 1 ते 3 सप्टेंबर या कालावधीत हॉटेल पॅव्हेलियन, मधुसुदन हॉल, बसंत-बहार टॉकीज रोड येथे होणार आहे.

वेगाने वाढणार्‍या पुण्यामध्ये घर आणि व्यावसायिक जागा शोधणार्‍यांची धावपळ या प्रदर्शनामुळे थांबणार आहे. पुणे शहर व शहराजवळील प्राईम लोकेशन असणारे दोनशेहून अधिक गृहप्रकल्प आणि व्यावसायिक जागा त्यातील विविध सोयीसुविधा एकाच ठिकाणी पाहण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळणार आहे. दै.‘पुढारी’ पुणे प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये पुण्यातील नामवंत बांधकाम व्यावसायिकांचे गृहप्रकल्प असणार आहेत. याशिवाय वित्तीय संस्थाही सहभागी होणार आहेत. त्यामुळे पुण्यात घर घेणं आणखी सोपं होणार आहे.  या प्रदर्शनासाठी कॅनरा बँक ही बँकिंग पार्टनर आहे.

पुण्यामध्ये बांधकाम व्यवसायाने मोठी उंची गाठली आहे. आलिशान गृहप्रकल्पांचे शहर अशी पुण्याची ओळख आहे. नामवंत बांधकाम व्यावसायिकांनी सर्व सोयीनियुक्‍त गृहप्रकल्प साकारले आहेत. पुण्याच्या मोक्याच्या ठिकाणी वास्तू खरेदी करता येणार आहे. वन-टू-फोर बीएचकेपर्यंतचे पर्याय तसेच रो हाऊसेस, बंगलो, पेंट हाऊस, फ्लॅट, ओपन प्लॉट विक्रीसाठी प्रदर्शनात असणार आहेत.
समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. अनेक माहिती- तंत्रज्ञान कंपन्या पुण्यात आहेत. आय.टी., शिक्षण, आरोग्य, औद्योगिक क्षेत्राप्रमाणे बांधकाम क्षेत्रही पुण्यामध्ये विकसित झाले आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश असणार्‍या पुण्यात घर घेण्याचे स्वप्न दै. ‘पुढारी’मुळे साकारणार आहे. सहभागी संस्था ः- अमित एंटरप्राईझेस लि., गोयल गंगा ग्रुप, कोलते-पाटील डेव्हलपमेंट लि., गीरा डेव्हलपमेंट  प्रा. लि., पुणे, गोवा, बेंगलुरू, श्री. व्यंकटेश बिल्डकॉन (अ‍ॅन अंकुश असबे), रोहन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि., युनिक मल्टिकॉन इंडिया प्रा. लि., प्राईड वर्ल्ड सिटी- 
चार्र्‍होली, पुणे, कोहिनूर ग्रुप, पुणे, शिव असोसिएटस्, नाईकनवरे डेव्हलपर्स प्रा. लि., निर्माण डेव्हलपर्स, अभिनव सिद्धेश रेनबो. प्रदर्शनाच्या अधिक माहितीसाठी चंदन - 8805007687 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.