Thu, Jul 18, 2019 21:27होमपेज › Kolhapur › नात्यांच्या उत्सवात रंगल्या कस्तुरी सभासद

नात्यांच्या उत्सवात रंगल्या कस्तुरी सभासद

Published On: Aug 31 2018 1:39AM | Last Updated: Aug 31 2018 12:28AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

श्रावण सरींसोबत श्रावणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लब आणि झी मराठीच्या वतीने ‘उत्सव नात्यांचा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मराठी-हिंदी गीतांचा सुरेल अनुभव आणि नृत्याचा आनंद घेत झी मराठीवरील कलाकार ‘बाजी’फेम अभिजित श्‍वेतचंद्र व हिरा म्हणजेच नुपूर दैठणकर, ‘तुझ्यात जीव रंगला’मधील राणा म्हणजेच हार्दिक जोशी आदींसोबत गप्पा-गोष्टींसह नात्यांच्या या उत्सवात कस्तुरी सभासद अक्षरश: रंगून गेल्या. केशवराव भोसले नाट्यगृहात ‘उत्सव नात्यांचा’ बहरला होता. कार्यक्रमास दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबच्या अध्यक्षा सौ. स्मितादेवी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. 

कस्तुरी क्‍लबला सभासदांचा मिळणारा उस्फूर्त प्रतिसाद व्हिडीओद्वारे दर्शवण्यात आला. प्रल्हाद कुडतरकर व तन्वी पालव यांच्या बहारदार निवेदनाने कार्यक्रमात रंगत आणली. चैतन्य कुलकर्णी, रसिका गानू, आरोही म्हात्रे आणि प्रसेनजीत कोसंबी यांनी सुरेल गीतांवर महिलांना ठेका धरण्यास भाग पाडले. संगीत नृत्याची ही मैफल चांगलीच रंगत गेली. कलाकारांनी आपले अनुभव कथनासह कस्तुरी सभासदांशी दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी नगरसेविका उमा बनछोडे, सूरमंजिरी लाटकर, स्वाती यवलुजे, माधुरी लाड, खातू मसालेच्या शर्मिला ढवण उपस्थित होत्या.

बाजी छत्रपतींचा मावळा...
बाजी सीरियलमधून मी छत्रपतींचा मावळा साकारला आहे. रात्रंदिवस एक करून आम्ही सीरियल शूट करतोय. त्या काळचे मराठा साम्राज्य दाखवण्यासाठी झटत असल्याचे सांगितले, तर नुपूरनेही आपला अनुभव सांगितला. 

 आजच कस्तुरी क्‍लबचे सभासद व्हा! 
दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबची नवीन सभासद नोंदणी सुरू झाली असून, 600 रुपये सभासद नोंदणी फी आहे. यामध्ये लगेचच 550  रुपयांचा प्रेशर कुकर आणि अग्रवाल गोल्ड यांच्याकडून 999 रु.च्या गोल्ड प्लेटेड बांगड्या हमखास गिफ्ट म्हणून मिळते. याचबरोबर माईज रेस्टो-नाष्ट्याचा एक पदार्थ, चिंटूज रेसोई - व्हेज किंवा नॉनवेज बुफे, हॉटेल अभिनंदन - एक थाळी, क्रिमस्टोन आईस्क्रीम - 120 रुपयांचे आईस्क्रीम, फ्यूजन कॅफे- कॅफेमधील एक पदार्थ, रामचंद्र तवनाप्पा मूग - मसाला चटणी पाऊच, खातू मसाले - मसाले पाऊच, क्रिष्णाई उद्योग- कोकनट ऑईल बॉटल असे मोफत कुपन्स मिळणार आहेत. याशिवाय असे बरेच डिस्काऊंट कुपन्ससुद्धा मिळणार आहेत. तरी आजच सभासद व्हा. 
संपर्क ः- 0231-6628943,  8805007724, 8805007461