Thu, May 23, 2019 15:33
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › दै. ‘पुढारी’च्या वर्धापनदिनी बालकल्याण संकुलला मदत

दै. ‘पुढारी’च्या वर्धापनदिनी बालकल्याण संकुलला मदत

Published On: Jan 12 2018 1:52AM | Last Updated: Jan 12 2018 12:21AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

दैनिक ‘पुढारी’च्या वर्धापनदिनी ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी ‘पुढारी’च्या वर्धापनदिनाकरिता पुष्पगुच्छ व हार देऊन शुभेच्छा न देता त्याची रक्‍कम बालकल्याण संकुलास मदत म्हणून द्यावी, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत समाजातील दानशूर व्यक्‍तींनी बालकल्याण संकुलास सढळ हाताने मदत केली. 

यामध्ये डॉ. अभय शिर्के,  शिवाजी विद्यापीठ उपकुलसचिव डॉ. प्रमोद शहाजी पांडव, अ‍ॅमॅच्युर कोल्हापूर जिल्हा रोलर स्केटिंग असो., लक्ष्मण हिंदुराव हवालदार, प्रवीण दादासाहेब इंदुलकर, रोहित राजेंद्र हवालदार, संजय कुलकर्णी, मेघा राजेश लाटकर, कोल्हापूर महानगरपालिका अग्‍निशामक दल, कुलदीप वसंतराव पाटणकर, केतना परेश शेठ, राजू माने, लिलीभाई गोलंदाज, श्री बुक एजन्सी, सुभाष चौगुले, डी. बी. पाटील, स्वातंत्र्यसैनिक एस. आर. पाटील, डॉ. वाघ, नागेश बंडोपंत पोतदार, संपत कराळे, संदीप गिरीगोसावी, तानाजी नंदीवाले, अशोक देसाई, पी. डी. धुंदरे, शिवाजी विद्यापीठ सेवक संघ, हिंदुराव गणपत शेळके, दत्तात्रय दिगंबर आचार्य, मार्केट इन्फो आयएनसी, आर. बी. नढाळे, विश्‍वास काटकर, दगडू माने, त्रैलोक्य तानाजी नरळे, डॉ. जयश्री चव्हाण, चि. अविनाश आदींनी मदत केली. दैनिक ‘पुढारी’च्या या सामाजिक उपक्रमाबद्दल जिल्हा परीविक्षा व अनुरक्षण संघटनेच्या वतीने मानद कार्यवाह पद्मजा तिवले यांनी आभार व्यक्‍त केले.