Tue, Jul 16, 2019 01:34होमपेज › Kolhapur › ‘पुढारी’ अंकुर क्लबच्या वतीने रोबोटिक्स कार्यशाळा

‘पुढारी’ अंकुर क्लबच्या वतीने रोबोटिक्स कार्यशाळा

Published On: May 09 2018 2:04AM | Last Updated: May 08 2018 11:21PMकोल्हापूर : प्रतिनिधी

दै. ‘पुढारी’च्या अंकुर क्लबच्या वतीने कोल्हापुरात 16 ते 21 मे दरम्यान रोबोटिक्स कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यात उच्चशिक्षित व अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. 15 मेपर्यंत नाव नोंदणी सुरू राहणार आहे.

इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी होणारी ही कार्यशाळा दररोज सकाळी अकरा ते दुपारी एकपर्यंत चालणार आहे. रोबोटिक्स आणि  उच्च तंत्रज्ञानाची विद्यार्थ्यांना माहिती देण्याबरोबरच त्यांच्यात त्याविषयाची आवड निर्माण करण्यासाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयोगी ठरणार आहे. मुलांना स्मार्ट बनविणे आणि विज्ञान प्रसार हा देखिल या कार्यशाळेमागचा हेतू आहे. प्रोजेक्टर आणि व्हिडीओ द्वारे दिल्या जाणार्‍या या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन केले जाणार असून त्यांच्या शंका आणि प्रश्‍नांनाही समर्थ उत्तरे प्रशिक्षकांकडून दिली जातील. प्रात्यक्षिकांचे ज्ञान, कौशल्य विकास, एकाग्रता, आत्मविश्‍वास, कल्पनाशक्ती विकास, निरीक्षकण शक्ती व गतिशिलता अशा कलागुणांची वाढ होण्यासही ही कार्यशाळा उपयोगी ठरणार आहे. 

या कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांना रोबोट हाताळाण्यास मिळणार आहेत. अविष्कार रोबोटिक्स कीटच्या सहाय्याने प्रयोग व प्रात्यक्षिके दाखविली जाणार आहेत. यासोबत थ्री डी प्रिंटर व ड्रोन कॅमेर्‍यांचे कार्य आणि प्रात्यक्षिके याबाबतचे मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यशाळेतील सहभागी सर्वांना प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.

नाव नोंदणीसाठी टोमॅटो एफएम 94.3 च्या कार्यालयात बागल चौकाजवळच्या वसंत प्लाझा येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9765566377 आणि 9765566604 तसेच 0231- 6625943 या क्रमांकावर संपर्क साधावा.
 

Tags :  kolhapur, pudhari Ankur Club