Sun, Jul 21, 2019 01:49होमपेज › Kolhapur › मीरा बोरवणकर खऱ्या झाशीच्या राणी : डॉ. प्रतापसिंह जाधव 

मीरा बोरवणकर खऱ्या झाशीच्या राणी : डॉ. प्रतापसिंह जाधव 

Published On: Mar 09 2018 8:11PM | Last Updated: Mar 09 2018 8:11PMकोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन

मीरा बोरवणकर यांच्या कामगिरीचा ठसा कोल्‍हापूर, सातारा, नाशिक व मुंबई शहरावर आजही कायम आहे. त्‍यांना झाशीची राणी ही पदवी त्यांचा कामामुळे मिळाली असून, खऱ्या अर्थाने त्‍या झाशीच्या राणी आहेत. असे मत दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी व्यक्‍त केले. 

पुढारी वृत्त समूहच्या कस्तुरी क्लबतर्फे An Inspiration कार्यक्रमात भारत सरकारच्या पोलिस संशोधन विकास संस्थेच्या अध्यक्ष डॉ. मीरा बोरवणकर यांच्या 'माझ्या आयुष्याची पानं' या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या शुभ हस्ते झाले, त्‍यावेळी  ते बोलत होते. 

डॉ. प्रतापसिंह जाधव म्‍हणाले, ‘‘मीरा बोरवणकर यांचे 'माझ्या आयुष्याची पानं' हे आत्‍मचरित्र नसून ते मुक्‍त चिंतन आहे. बोरवणकर  ज्‍या ठिकाणी सेवेत असतील त्‍या ठिकाणी त्‍यांनी समाजाच्या हिताचे कार्य केले आहे. त्‍यांच्या कार्यशैलीतूनच त्‍यांचा कणखरपणा दिसून येतो.’’

डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी यावेळी मीरा बोरवणकर यांना ‘झाशीची राणी’ का म्हणतात याचा किस्‍सा सांगितला. ते म्‍हणाले,‘‘ बोरवणकर यांचा मुलगा लहाण होता, त्‍यावेळी त्‍याला पाठीवर घेवून राउंडसाठी त्‍या घरातून बाहेर पडत. त्‍यामुळे त्‍यांना लोकांनी झाशीची राणी ही उपाधी दिल्‍याचे डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी सांगितले.