Thu, Jun 27, 2019 13:43होमपेज › Kolhapur › प्रकाश आंबेडकर यांची सिद्धार्थनगरातील भेट रद्द

प्रकाश आंबेडकर यांची सिद्धार्थनगरातील भेट रद्द

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 14 2018 12:04AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

भारीप पक्षाचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची सिद्धार्थनगरची नियोजित भेट रद्द झाली. सर्किट हाऊस येथेच त्यांनी सिद्धार्थनगरातील कार्यकर्त्यांशी चर्चा केली. दरम्यान, सिद्धार्थनगर भेटीच्या पार्श्‍वभूमीवर या ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

कोल्हापूर बंदच्या काळात झालेल्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर शनिवारी कोल्हापूर दौर्‍यावर आले होते. सकाळी अकरा वाजता ते कोल्हापुरात सर्किट हाऊस येथे आले. सिध्दार्थनगर येथे भेट देणार असल्याने त्या अनुषंगाने कार्यक्रमाची तयारी करण्यात आली होती. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू कसे दिसतात हे पाहण्याच्या उत्सुकतेपोटी   अनेक महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी आल्या होत्या.  दुपारी 12 वाजता अ‍ॅड. प्रकाश  आंबेडकर येणार असा निरोप आला. त्यामुळे सिध्दार्थनगर कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली. 

दुपारी 2 वाजेपर्यंत अ‍ॅड. आंबेडकर आले नाहीत. तेव्हा सर्किट हाऊस येथे कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू आहे, असे सांगण्यात आले. त्यामुळे सिध्दार्थनगर येथील कार्यकर्त्यांनी सर्किट हाऊस येथे आंबेडकर यांची भेट घेतली. यावेळी नियोजित कार्यक्रमामुळे आपण सांगली येथे जात असल्याने सिध्दार्थनगर येथे येत नाही. पुन्हा सिध्दार्थनगरला भेट देतो, असे कार्यकर्त्यांना त्यांनी यावेळी सांगितले.