होमपेज › Kolhapur › कोल्हापूर विमानसेवा लांबण्याची शक्यता

कोल्हापूर विमानसेवा लांबण्याची शक्यता

Published On: Dec 13 2017 1:54AM | Last Updated: Dec 13 2017 1:16AM

बुकमार्क करा





कोल्हापूर : प्रतिनिधी

येथील उजळाईवाडी विमानतळावरून पंधरा डिसेंबरपर्यंत विमानसेवा सुरू होण्याची शक्यता कमी आहे. धावपट्टीच्या कामाची सुधारणा करण्याचे काम सुरू असून त्यास किमान आठवडाभराचा कालावधी लागले, असे सुत्रांनी सांगितले.

गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली विमानसेवा सुरू होण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह खासदार राजू शेट्टी, धनंजय महाडिक आणि संभाजीराजे यांनीही यासाठी नागरी विमान वाहतूक खात्याकडे पाठपुरावा केला. त्यानुसार विमानसेवा लवकरच सुरू होईल, असे सांगण्यात आले. पंधरा डिसेंबरपर्यंत विमान वाहतूक सुरू होण्याची चिन्हे असतानाच धावपट्टीच्या सुधारणेचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे किमान आठवडाभरानंतर विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे.