Thu, Jan 24, 2019 03:48होमपेज › Kolhapur › पेठवडगावमध्ये चोरी दीड लाखाचे दागिने लंपास

पेठवडगावमध्ये चोरी दीड लाखाचे दागिने लंपास

Published On: Dec 18 2017 2:33AM | Last Updated: Dec 18 2017 1:42AM

बुकमार्क करा

पेठ वडगाव : वार्ताहर 

 येथील पन्हाळकर वसाहतीतील मधुकर रामचंद्र नायकवडी यांच्या घराच्या मागील दरवाजाची कडी काडून डब्यातील 1 लाख 61 हजारांचे सोन्याचे दागिने  चोरट्याने लंपास केले. चोरीची वर्दी मधुकर नायकवडी यांनी वडगाव पोलिस ठाण्यात दिली. दरम्यान, चोरट्याचा माग काढण्यासाठी श्‍वान पथक व ठसेतज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले. मात्र, चोरट्यांचा माग काढण्यात पोलिसांना यश आले नाही.  येथील पन्हाळकर वसाहतीमध्ये मधुकर नायकवडी यांचे घर आहे.नेहमीप्रमाणे नायकवडी आपल्या पत्नी राजाक्का  पहाटे फिरायला  जाणयासाठी उठला होत्या.

यावेळी तिजोरीतील कपडे व इतर वस्तू विस्टकलेला त्यांना दिसल्या .त्यांनी पती व मुलगा आकाश यांना उठविले. या घटनेची माहिती दिली. ते बाहेर जाण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करताना त्यांना बाहेरून कडी लावल्याचे समजले. यावरून चोरी झाल्याची खात्री झाली. नायकवडी यांनी स्वयंपाकाच्या खोलीत ठेवलेल्या  डब्यातील सोन्याचे दागिने लंपास झाले असल्याचे निदर्शनास आले.
या डब्यातील सोन्याचे घंटण, लक्ष्मी हार, बोरमाळ, सोन्याचा गोप, सोन्याची चेन, पदक, बदाम तसेच चांदीचा करदोडा, कडे व  साधा मोबाईल असा 1 लाख 61 हजार रुपयांचा  ऐवज लंपास केला. अशी वर्दी नायकवडी यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे.