Tue, Sep 25, 2018 04:53होमपेज › Kolhapur › दत्तवाड येथे रूग्‍णांकडून डॉक्‍टरांना मारहाण 

दत्तवाड येथे रूग्‍णांकडून डॉक्‍टरांना मारहाण 

Published On: May 28 2018 11:16PM | Last Updated: May 28 2018 11:16PMकुरुंदवाड(जि. कोल्‍हापूर) : प्रतिनिधी 

दत्तवाड (ता. शिरोळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सी. एस. खांबेसह दोन कर्मचाऱ्यांना रुग्णांकडून मारहाण करण्यात आली. आज(दि. २८ मे) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी सतीश शंकर वडर (वय, 36 रा.दत्तवाड ता.शिरोळ) यांचे विरुद्ध कुरूंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या मारहाणीत डॉ. खांबे यांच्या मानेला, गणेश पांढरबळे यांच्या छातीवर आणि सचिन गलीयल यांच्या पायाला दुखापत झाली आहे. रुग्णांकडून वैद्यकीय अधीक्षकांना व कर्मचार्‍यांना मारहाणीचा प्रकार घडल्याने आरोग्य केंद्राच्या परिसरामध्ये तणाव निर्माण झाला आहे.