Wed, Jul 17, 2019 08:09होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त फेथ फौंडेशनची रॅली(व्हिडिओ)

कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त फेथ फौंडेशनची रॅली(व्हिडिओ)

Published On: Jan 26 2018 11:34AM | Last Updated: Jan 26 2018 11:34AMकोल्हापूर : प्रतिनिधी

ढोलताशा, लेझीम या पारंपरिक वाद्यांसह चित्तथरारक मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, ‘आय इंडियन’ या संकल्पनेवर आधारीत लक्षवेधी फलक आणि ‘भारत माता की जय’ चा अखंड जयघोष’, अशा उत्साही वातावरणात शुक्रवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शहातून रॅली काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरुन निघालेल्या या रॅलीत विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी व युवक हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कोल्हापूरातील फेथ फौंडेशनच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. बिंदू चौकात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, अरुधंती महाडिक, प्रतिमा पाटील, मधुरिमाराजे, सरोज शिंदे, माजी महापौर सई खराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीचे उद्घाटन झाले.

संपुर्ण रॅली मार्गावर उत्साहाचे वातवारण होते. नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील यांच्या पथकाने विविध कला सादर केली. करवीर नाद ढोलताशा पथकाने विविध कला सादर केली. रॅलीत मर्दानी खेळाचे चित्तथरारक प्रात्यक्षिकही पहायला मिळाली. विक्रम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीमवर ताल धरला. कोल्हापूरची कुस्ती परंपरा दाखविणारे पैलवानांचे पथकही लक्षवेधी ठरले. ‘आय इंडियन’ या थीमवर आधारीत विविध फलक रॅलीत होती. मुलांनी विविध स्टंट सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळविली. बिंदू चौकातून सुरु झालेली ही रॅली पुढे शिवाजी चौक महानगरपालिका दसरा चौक येथे आली. याठिकाणी रॅलीची सांगता झाली. संपुर्ण रॅलीमार्गावर उत्साहाचे वातावरण होते.  

हातावर तिरंगा टॅटू
सकाळी सात वाजल्यापासूनच विद्यार्थी व युवक बिंदू चौकात जमत होते. याठिकाणी अनेकांनी हातावर तिरंगा टॅटू काढून देशाप्रती प्रेम व्यक्त केले. टॅटू काढून घेण्यासाठी प्रत्येकांची धडपड सुरु होती. 

अपंग बांधवाचा उत्साह
रॅलीत अपंग बांधव हातात तिरंगा आणि एकसारखा गणवेश परिधान करुन रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीच्या सर्वात पुढे अपंग बांधव होते. प्रत्येकांच्या चेहर्‍यावर उत्साह दिसून येत होता.