Sun, Feb 17, 2019 17:55होमपेज › Kolhapur › कोल्हापुरातील सिटी बसला प्रवाशांचा 'दे धक्का'

कोल्हापुरातील सिटी बसला प्रवाशांचा 'दे धक्का'

Published On: Jan 11 2018 12:14PM | Last Updated: Jan 11 2018 12:13PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

येथील मध्यवर्ती बस स्थानकासमोर आज सकाळी केएमटी बस बंद पडल्याने प्रवाशांना धक्का द्यावा लागला. केएमटी बस एकेरी वाहतुकीमध्ये बंद पडल्याने कांही काळ वाहनांची कोंडी झाली.

बसमधील सर्व प्रवाशांकडून बसला धक्का देण्यात आला. मात्र, उशिरापर्यंत बस चालू झाली नाही. बसस्थानक परिसरात वाहनांची कोंडी झाल्यानंतर एकेरी वाहतुकीतून बाहेर काढण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. उशिरापर्यंत सिटी बस बस स्टॅण्डजवळ थांबून होती.