Mon, Sep 24, 2018 10:06होमपेज › Kolhapur › पासार्डे येथे तलावात बुडून मेंढपाळाचा मृत्यू

पासार्डे येथे तलावात बुडून मेंढपाळाचा मृत्यू

Published On: Feb 11 2018 1:55AM | Last Updated: Feb 11 2018 1:14AMसांगरूळ : वार्ताहर 

बकर्‍यांना चारायला घेऊन गेलेल्या मेंढपाळ राघू बापू देवणे (वय 17, रा. वेतवडेपैकी भेंडाईचा धनगरवाडा, ता. पन्हाळा) याचा तलावात पाय घसरून बुडून मृत्यू झाला. हा प्रकार पासार्डे (ता. करवीर) येथील पाझर तलावात शुक्रवारी सायंकाळी घडला. बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबातील सदस्यांनी शोधाशोध केली असता शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले .

राघू शुक्रवारी सकाळी 10 वाजता घरातून बकरी चारायला पासार्डे (ता. करवीर) येथील डोंगरात घेऊन गेला होता. सायंकाळी उशिराने बकरी घरी परतली; पण तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली. त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. शनिवारी सकाळी 6 वाजता त्याची कुर्‍हाड आणि काठी तलावाच्या काठाला आढळली. पासार्डे ग्रामस्थांनी मृतदेह शोधण्यास सुरुवात केली; पण मृतदेह न आढळल्याने पासार्डे पोलिसपाटील, सरपंच यांनी करवीर पोलिस, व्हाईट आर्मीच्या स्वयंसेवकांना कळविले. त्यानंतर 8 वाजता पोलिस, व्हाईट आर्मीचे स्वयंसेवक यांच्या शोधमोहिमेनंतर राघू याचा मृतदेह सापडला. या घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे. त्याच्या पश्‍चात आई, वडील, तीन भाऊ असा परिवार आहे.