Mon, Jul 22, 2019 05:19होमपेज › Kolhapur › राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात ‘परिवर्तन यात्रा’

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात ‘परिवर्तन यात्रा’

Published On: Apr 12 2018 1:26AM | Last Updated: Apr 12 2018 1:25AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राज्य सरकारविरोधात संघर्ष यात्रा काढली. आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन यात्रा काढली जाईल. राज्यातील प्रत्येक मतदार संघात काढल्या जाणार्‍या या यात्रेचा प्रारंभ कोल्हापुरातून करण्याचा विचार असल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी सांगितले.

कोल्हापूर दौर्‍यावर आलेले विखे-पाटील म्हणाले, राज्यात सरकारविरोधी वातावरण तयार होत आहे. बदललेल्या वातावरणामुळे भाजपला काँग्रेसची भीती वाटू लागली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत एकमेकांची औकात काढण्याची भाषा केली जात होती. ‘एकला चलो रे’चा नारा दिला जात होता. आज मात्र भाजप युतीची भाषा करू लागला आहे.

राष्ट्रवादीशी आघाडी
भाजपला  जमिनीवर  आणण्यासाठी रणशिंग फुंकणार असल्याचे सांगत विखे-पाटील म्हणाले, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन यात्रा व जिल्हानिहाय मेळावे घेतले जाणार आहेत. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केली जाणार आहे. 

क्राईम रेट वाढला

राज्यात गुन्हेगारांना ‘राजाश्रय’ दिला जात आहे. राज्यात क्राईम रेट वाढत चालला आहे, असा आरोप करत विखे-पाटील म्हणाले, गुंडांचा बंदोबस्त करण्याऐवजी त्यांना थाटामाटात पक्षप्रवेश दिला जात आहे. त्यातून भाजपचा विस्तार सुरू आहे.

अहमदनगर येथील घडलेला प्रकार हा पूर्ववैमनस्यातून घडला आहे, त्यात राजकीय सूडबुद्धीने कारवाई होऊ नये. जे दोषी असतील, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, त्यावर कारवाई झाली पाहिजे, अधीक्षक कार्यालयावर हल्ला होणे, ही गंभीर बाब आहे.

या सर्व प्रकाराची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करत ज्या ठिकाणी अवैध इमारती बांधल्या जातात, इमारती पडतात, शेकडोंचा बळी जातो, बिल्डरला हाताशी धरून हा सर्व प्रकार सुरू असतो, अशा ठिकाणी शिवसेना रस्त्यावर का येत नाही, असा सवालही विखे-पाटील यांनी केला.
 

Tags : parivartan yatra, Rahul Gandhi, leadership, Maharashtra, kolhapur news