पन्हाळा : बांबरवाडीतील युवकाला कोरोना, पण कुणाच्याही संपर्कात नाही 

Last Updated: May 23 2020 9:43AM
Responsive image


पन्हाळा (कोल्हापूर)  : पुढारी वृत्तसेवा

मुंबई येथील कायम रहिवासी असलेल्या बांबरवाडी गावचा युवक कोरोना बाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या युवकाचा बांबरवाडी गावाच्या कोणाशीही संपर्क आलेला नाही, त्यामुळे बांबरवाडीतील गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तर या युवकाच्या माले येथील चार नातेवाईकांची तपासणी करण्यासाठी त्यांना सीपीआरमध्ये नेण्यात आले असल्याची माहिती मिळते. 

याबाबत अधिक माहिती अशी की, बांबरवाडी येथील आई-वडील व मुलगा असे एक कुटुंब मुंबईमध्ये कायम रहिवासी आहेच. युवक हा अभियंता असून कोरोनामुळे तो आपल्या आई-वडिलांना घेऊन बांबरवाडी या मूळ गावी आला. मात्र,  गावाला पोहोचण्यापूर्वी गावाच्या दक्षता समितीने त्याला तपासणी केल्याशिवाय गावात येण्यास मज्जाव केला. त्यानुसार या कुटुंबातील तिघांच्या तपासणीनंतर संस्थात्मक अलगीकरण कक्षात रवानगी झाली. पण या कक्षात हे कुटुंब उशिरा पोहोचल्यामुळे त्यांना रात्री या ठिकाणी प्रवेश नाकारला. म्हणून ते सर्वजण वाघबीळ येथे दुसऱ्या अलगीकरण कक्षात गेले. पण तेथील व्यवस्था पाहून हे कुटुंब वाघबिळातीलच एका खासगी हॉटेलमध्ये राहायला गेले. हॉटेल मालकाला हे कुटुंब मुंबईतून आले असल्याचे समजल्यावर त्यांनी त्याला तातडीने बाहेर जायला सांगितले. त्यानंतर हे कुटुंब आपल्या नातेवाईकांच्या जगदाळेवाडी परिसरातील एका हॉटेलवर राहायला गेले. याठिकाणी हे कुटुंब १९ मे पासून राहत होते. या कुटुंबातील कोणाचाही बांबरवाडी गावातील लोकांशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संपर्क आला नसल्याचे समजते. गावच्या सतर्कतेमुळे बांबरवाडी गावात हे कुटुंब आले नाही. येथील मूळ रहिवासी असल्यानेच बांबरवाडी गावचे नाव कोरोना यादीत आले अशी प्रतिक्रिया येथील गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. 

रात्री उशिरा कोरोना बाधित युवक व त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या युवकाच्या आई-वडिलांना वाघबीळ येथे अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती पन्हाळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ए. एस. कवठेकर यांनी दिली. तसेच रेड झोनमधून आलेली ५२९ जण पन्हाळा तालुक्यात ठिकठिकाणी अलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती डॉ. कवठेकर यांनी दिली.

जळगाव : कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढला, डेथ ऑडिट कमिटीची स्थापना


बारामती तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या २० वर 


पहिल्या कोरोनाबाधिताच्या शरिरात १७ दिवसांपर्यंत सक्रिय होता संसर्ग! 


बुलडाणा :  २ नवीन पॉझिटिव्ह रूग्ण आढळले


गोवा : ब्रिक्स निकृष्ट अन्‍न प्रकरणी जबाब सादर करा : मानवाधिकार आयोग


अकोल्यात कोरोनाचे ४६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण 


देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, म्हणाले...


नवी मुंबई : दिवसाढवळ्या कॉन्ट्रॅक्टरची गोळ्या घालून हत्या


वाशिम जिल्हयात चार मद्यविक्री परवाने निलंबित


मॉलमधील वाईन शॉपला ऑनलाईन मद्यविक्रीची परवानगी द्या, हायकोर्टात याचिका