Wed, Jun 26, 2019 17:28होमपेज › Kolhapur › टोमॅटो एफ.एम.तर्फे उद्या बालकल्याण संकुलच्या मुलींसाठी ‘पॅडमॅन’चा खास शो

टोमॅटो एफ.एम.तर्फे उद्या बालकल्याण संकुलच्या मुलींसाठी ‘पॅडमॅन’चा खास शो

Published On: Feb 11 2018 1:55AM | Last Updated: Feb 10 2018 11:01PMकोल्हापूर : प्रतिनिधी

मासिक धर्मावर आधारित पॅडमॅन या सध्या सर्वत्र चर्चिल्या जाणार्‍या चित्रपटाचा खास शो बालकल्याण संकुलमधील मुलींसाठी आयोजित करण्यात आला आहे. 

टोमॅटो एफ.एम. व प्रयोग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (12 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता पीव्हीआर सिनेमाज कोल्हापूर येथे हा चित्रपट दाखवला जाणार आहे. या सामाजिक उपक्रमासाठी पूर्वा एंटरप्राईजेस यांचे फिल फाईव्ह सॅनिटरी नॅपकीन्स आणि अनघा ज्वेल्स हे प्रायोजक म्हणून लाभले आहेत. 

मासिक धर्म ही नैसर्गिक क्रिया आहे; पण त्याबाबत समाजात बरेच गैरसमज आहेत. यामुळे या दिवसात स्वच्छतेकडे मुलींचे खूप दुर्लक्ष होते. लहान वयातच मुलींना जननेद्रीयांशी संबंधित आजार जडतात. अशावेळी सॅनिटरी पॅड वापरले तर हे धोके कमी होऊन मुलींचे आरोग्य जपले जाते. पॅड वापरण्याबाबत जागृती करण्याचे काम पॅडमॅन या हिंदी चित्रपटातून करण्यात आले आहे. मुलींच्या मनात मासिक धर्माविषयी असलेले गैरसमज दूर होऊन त्या दिवसात स्वत:ची कशी काळजी घ्यायची, याची माहिती मिळणार आहे. 

बालकल्याण संकुलमध्येही किशोरावस्थेतील मुली असतात. त्यांना याबाबतीत जाणीवजागृती व्हावी, या हेतूने हा चित्रपट त्यांना दाखवला जाणार आहे, असे प्रायोजक असलेल्या वनिता संदीप पाटील यांनी सांगितले.