Thu, Apr 25, 2019 18:11होमपेज › Kolhapur › आम्ही, सरकार संजय घाटगेंच्या पाठीशी

आम्ही, सरकार संजय घाटगेंच्या पाठीशी

Published On: Apr 23 2018 1:50AM | Last Updated: Apr 23 2018 1:40AMकागल : प्रतिनिधी

आपली परंपरा आहे की शत्रूने कायम आपल्यात फूट पाडून आपला विजय करून घेतला. आता असे होऊ देऊ नका. संजयबाबा कोणत्याही पक्षात असले तरी आम्ही आणि सरकार त्यांच्या पाठीशी आहोत, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. माजी आमदार संजय घाटगे यांच्या  वाढदिवसानिमित्त येथील गैबी चौकात आयोजित कार्यक्रमात  ते बोलत होते. खासदार संभाजीराजे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक, आ. सुरेश हाळवणकर, हिदुराव शेळके उपस्थित होते.  

ना. पाटील म्हणाले, संजय घाटगे संघर्ष करताना कधीही मोडून पडले नाहीत. ते कोणत्या पक्षात आहेत कोणत्या पक्षात असणार आहेत. कोणाचा झेडा घेऊन उभा राहणार आहेत हे महत्त्वाचे नाही त्यांच्या पाठीशी कायमपणे सरकार राहणार आहे. ज्यावेळी देण्याची वेळ असेल तेव्हा मेरीटवर योग्य प्रामाणिक माणूस म्हणून सरकारची मदत राहील. राजकारणात एका रात्रीत सगळ घडत असत तशी रात्र अजून यायची आहे ती रात्र येईल तेव्हा पाहू. खासदार  संभाजीराजे म्हणाले, संजय घाटगे यांनी 2009 सालच्या निवडणुकीत मला प्रामाणिकपणे मदत केली.  अनेक संस्था त्यांनी स्वकर्तृत्वाने उभ्या केल्या. पराभवाने खचून न जाता कायमपणे त्यांनी लोकांची सेवा केली आहे.

प्रा. संजय मंडलिक म्हणाले, तालुक्यातील 90 टक्के लोक वेगवेगळ्या गटात आहेत. 10 टक्के लोक कायमपणे इकडून तिकडे करीत असतात त्यामुळे राजकारण बदलले, असे होत नाही. संजयबाबा घाटगे यांची जनतेची बँक मोठी आहे. ती आनखीन वाढणार आहे.आ. सुरेश हाळवणकर म्हणाले संजयबाबा लढाऊ नेता आहे काही माणसं पैसे आणि सत्ता तसेच वारसाच्या बळावर पुढे जातात, मात्र संजयबाबा जनतेच्या जीवावर पुढे जाणारे नेतृत्व आहे. 

संजय घाटगे म्हणाले, आम्ही कधीही आमचा लढाऊ बाणा सोडला नाही.  कायमपणे प्रवृतीच्या विरोधात लढाई केली. यश-अपयश पाहिले नाही.  सध्या पैसा आणि सत्ता यांच्या जोरावर कारखाने उभे केले जातात. मात्र, जनतेच्या बळावर कारखान्याची उभारणी केली जात आहे. लवकरच त्यांची पायाभरणी होणार आहे.स्वागत गोकुळचे संचालक अबरिशसिंह घाटगे यांनी केले. दत्ताजी घाटगे, धनराज घाटगे, विक्रांत पाटील यांची भाषणे झाली. आभार संजय कदम यांनी मानले. यावेळी सभापती सौ. कमल पाटील, नगराध्यक्ष राजेखान जमादार, आप्पासो पाटील, बाबगोंडा पाटील, विवेक कुलकर्णी, दतोपंत वालावलकर, संभाजी फराकटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Tags : Kolhapur, our, support,  Sanjay Ghatge