Thu, May 23, 2019 20:54
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › दोघा परप्रांतीय चोरट्यांना अटक

दोघा परप्रांतीय चोरट्यांना अटक

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 23 2018 11:06PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

झटपट श्रीमंतीसाठी चोरी करणार्‍या राजस्थानच्या दोघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. बुधाराम मियाराम चौधरी (वय 42), रामनिवास उग्रराम चौधरी (21, दोघे रा. राजस्थान) अशी त्यांची नावे आहेत. शनिवार पेठेतील गेहानी टोबॅकोचे गोडावून फोडण्यात आले होते. 

लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दादा पवार यांच्या पथकाला सोमवारी रात्री जैन मंदिर परिसरात एक इसम संशयितरीत्या फिरताना दिसला. त्याच्याकडे चौकशी करण्यास गेलेल्या पोलिसांना तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याच्याजवळील कारची तपासणी केली. कारमध्ये कटावणी मिळून आली. त्याला 
पोलिसी खाक्या दाखवताच शनिवार पेठेतील गोडावूनमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. तसेच साथीदाराचेही नाव सांगितले.

चोरीचा माल पुण्यात विकला
गेहानी यांच्या टोबॅकोमधून चोरलेला मुद्देमाल चोरट्यांनी पुण्यातील एका व्यापार्‍याला विकल्याचे सांगितले. पोलिसांनी पुण्यातून सुमारे 2 लाख 52 हजारांचा मुद्देमाल जप्‍त केला. 
झटपट श्रीमंतीची हाव कोल्हापुरात येऊन चोरी करून झटपट श्रीमंत होण्याचा दोघांचा उद्देश होता. यासाठी त्यांनी ओएलएक्सवरून एक कारही खरेदी केली. दोघे मागील आठ दिवसांपासून कोल्हापुरात टेहळणी करीत होते.