Wed, Apr 24, 2019 22:04होमपेज › Kolhapur › ५ रुपयांत भाजी-चपाती; आंबेडकर जयंतीदिनी प्रारंभ

५ रुपयांत भाजी-चपाती; आंबेडकर जयंतीदिनी प्रारंभ

Published On: Apr 12 2018 1:26AM | Last Updated: Apr 12 2018 1:14AMकोल्हापूर : प्रतिनिधी

गरीब, मध्यमवर्गीय आणि गरजवंतांची भूक भागविण्यासाठी संवेदना सोशल फौंडेशनच्या वतीने पाच रुपयांत चपाती-भाजी देण्यात येणार आहे, अशी माहिती संवेदना सोशल फौंडेशनचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी दिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचा शुभारंभ  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी करण्यात येणार आहे. 

चिकोडे म्हणाले, योजनेचा शुभारंभ 14 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता ना. पाटील यांच्या हस्ते होईल.  योजनेमध्ये ऑफिस कर्मचारी, विद्यार्थी, हॉस्पिटल्स सर्वसामान्य गरजूंसाठी चपाती-भाजी देण्यात येईल. दोन चपाती व एक वाटी भाजी असेल. दुपारी 12 ते 2 या वेळेत ही सेवा घरपोचही उपलब्ध आहे. यासाठी सकाळी 8 ते 11 या  वेळेत नोंदणी करावी लागेल. शाहूपुरीतील लॉ कॉलेजसमोर असलेल्या विद्या प्रबोधिनीमध्ये हे केंद्र 14 एप्रिलपासून सुरू होत आहे.
 

Tags : five rupees, chapati bhaji, Ambedkar Jayanti Day, kolhapur news