Wed, Jul 24, 2019 01:56होमपेज › Kolhapur › टपर्‍यांना लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू

टपर्‍यांना लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू

Published On: Dec 29 2017 1:34AM | Last Updated: Dec 29 2017 1:19AM

बुकमार्क करा
उजळाईवाडी : प्रतिनिधी

गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत प्रवेशद्वाराजवळील चार टपर्‍यांना बुधवारी मध्यरात्री आग लागली. यावेळी मटक्याच्या टपरीत झोपलेल्या नासिर सादात मखमल्‍ला (वय 51, रा. आलास, ता. शिरोळ) यांचा भाजून मृत्यू झाला. दरम्यान, हा अपघात की घातपात, याचा तपास पोलिस करीत आहेत.

गोकुळ शिरगाव एमआयडीसीच्या प्रवेशद्वाराजवळ अवैधरीत्या टपर्‍या थाटल्या आहेत. उड्डाणपुलाला लागून असलेल्या टपरीतील चंद्रकांत भिकाजी गवळी (रा. तामगाव) यांचे श्रीकृष्ण कोचिंग वर्क्स,
लिंगोंडा तुकाराम गवळी (रा. कोगिल) यांचे चप्पल दुरुस्ती दुकान, एक सायकल दुकान आणि मटका बुकीची टपरी जळून खाक झाली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.  आगीत जळून खाक झालेल्या टपर्‍यांच्या आसपास कल्याण-मुंबई मटक्याचा पावत्यांच्या ढीग सापडला.