होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : किणी टोलनाक्यानजीक अपघातात १ ठार

कोल्‍हापूर : किणी टोलनाक्यानजीक अपघातात १ ठार

Published On: Jan 20 2018 1:10PM | Last Updated: Jan 20 2018 2:08PMकोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन

किणी टोल नाक्यानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत एकजण जागीच ठार झाले. मदन दत्ताजीराव भोसले (४६, रा. जुना बुधवार पेठ) असे मृताचे नाव आहे. आज सकाळी हा अपघात झाला. ते गव्‍हर्मेंट सर्व्‍हंट बँकेचे कर्मचारी होते.

मदन हे दुचाकीवरून पाली येथे देवदर्शनासाठी चालले होते. यावेळी ते किणी टोलनाक्यानजीक असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.