होमपेज › Kolhapur › पारगावजवळ अपघातात अभियंता ठार, 1 जखमी

पारगावजवळ अपघातात अभियंता ठार, 1 जखमी

Published On: Feb 04 2018 1:50AM | Last Updated: Feb 04 2018 12:47AM
पेठ वडगाव : वार्ताहर 

वाठार-वारणानगर रस्त्यावरील महात्मा गांधी हॉस्पिटलजवळ भरधाव ट्रॅक्टरने तीन वाहनांना जोरदार धडक देऊन झालेल्या विचित्र अपघातात मोटारसायकलस्वार सचिन सर्जेराव पाटील (वय 32, रा. नवे पारगाव) हा सॉफ्टवेअर इंजिनिअर जागीच ठार झाला, तर त्याचे भाऊ प्राचार्य संतोष पाटील गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झाला. 

हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील शामराव पाटील आय.टी.आय. संस्थेत प्राचार्य असलेले संतोष पाटील यांना मोटारसायकल  (एम एच 09 डी जी 5127 ) वरून घेऊन त्यांचे बंधू सचिन पाटील जात होते. कोडोलीच्या दिशेने ट्रॅक्टर भरधाव जात होता. वारणानगरहून वाठारच्या दिशेने वारणा कारखान्याची महिंद्रा पिकअप (एम एच 09- एल-5566), कार (एम एच 09 डीए-4103) व मोटारसायकल (एम एच 09-डीजी-2157) एकामागून ही वाहने जात होती. नवे पारगाव येथील महात्मा गांधी हॉस्पिटलजवळ  भरधाव ट्रॅक्टरने ओव्हरटेक करताना मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली. यात मोटारसायकलवर  मागे बसलेले प्राचार्य संतोष पाटील  महिंद्रा पिकअपच्या काचेवर जोरात आदळले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले, तर ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून सचिनचा जागीच मृत्यू झाला.