Mon, Nov 19, 2018 02:07



होमपेज › Kolhapur › दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे महिलांसाठी ‘वर्षासहल’

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे महिलांसाठी ‘वर्षासहल’

Published On: Jul 31 2018 1:31AM | Last Updated: Jul 31 2018 12:03AM



कोल्हापूर : 

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे महिलांसाठी वर्षासहलीचे आयोजन करण्यात आले आहे. खास ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने सभासदांना आपल्या मैत्रिणींसह राऊतवाडीला धमाल करण्याची संधी कस्तुरी क्लबने उपलब्ध करून दिली आहे. पर्यटकांना आकर्षित करणारा राऊतवाडीचा धबधबा हे या सहलीचे खास आकर्षण आहे. याबरोबरच विविध स्पॉट गेम्समधून सहलीदरम्यानही आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी महिलांना लाभणार आहे. या एकदिवसीय वर्षासहलीचे आयोजन दि. 4 ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. म्युझिक मस्ती आणि धम्माल स्पॉट गेम्ससह महिलावर्गाला ‘फ्रेंडशिप डे’ आपल्या मैत्रिणींसह साजरा करता येणार आहे.

या सहलीसाठी कस्तुरी क्लब सभासदांना प्रत्येकी फक्त रु. 550/- व जे सभासद नाहीत त्यांनी प्रत्येकी 700/- रु. शुल्क भरावयाचे आहे. सहलीचा प्रवास खर्च व सहलीदरम्यान सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळी चहा, बिस्कीट हे सर्व कस्तुरी क्लबमार्फत देण्यात येणार आहे. हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात राऊतवाडी धबधब्याचा आनंद व त्याबरोबरच धमाल मौजमजा लुटण्यासाठी सभासदांनी कस्तुरी क्लब आयोजित या सहलीमध्ये सहभागी व्हावे. सभासदांनी आपली नावे टोमॅटो एफ. एम. कस्तुरी विभाग, वसंत प्लाझा, 5 वा मजला, बागल चौक, कोल्हापूर येथे नोंदवावीत. अधिक माहितीसाठी फोन नं. ऑफिस - 0231-6625943, मोबा. - 8805007724, 8805024242.