Wed, Jun 26, 2019 11:24होमपेज › Kolhapur › उदगावजवळ अपघातात आळते येथील तरुण ठार 

उदगावजवळ अपघातात आळते येथील तरुण ठार 

Published On: Jun 27 2018 10:13AM | Last Updated: Jun 27 2018 10:13AMजयसिंगपूर : प्रतिनिधी 

उदगाव-अंकली टोल नाका बाह्य वळण महामार्ग चौकात भरधाव ट्रक व मोटारसायकल यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात आळते (तालुका हातकणंगले) येथील तरुण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. गफुर अल्लाउद्दीन मुजावर (वय १८ रा. मदरसा मागे वडगाव रोड आळते ) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे तर मुस्तफा बाबुलाल मुजावर असे जखमी तरूणाचे नाव आहे.

आळते शनिवारी होणाऱ्या ब्रुसच्यानिमित्ताने बकरी खरेदी करण्यासाठी गफुर आणि मुस्‍तफा  दुचाकीवरून (क्र. एमएच.09/BP 2638)मिरजेला जात होते. अपघातातील ट्रक (क्र. एमएच 07/802) सांगलीहून कोल्हापूरच्या दिशेने जात होता. यावेळी दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात गफुर जागीच ठार झाला तर, मुस्‍तफा गंभीर जखमी झाला. जखमीला स्‍थानिकांनी तात्‍काळ उपचारासाठी रूग्‍णालयात दाखल केले. 

दरम्‍यान, अपघाताची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्‍थळी जावून पंचनामा केला.