Fri, Nov 16, 2018 10:53



होमपेज › Kolhapur › आयपीएलच्या सामन्यात  सट्टा, एकाला अटक 

आयपीएलच्या सामन्यात  सट्टा, एकाला अटक 

Published On: Apr 23 2018 10:19AM | Last Updated: Apr 23 2018 10:19AM



इचलकरंजी : प्रतिनिधी 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली डेअरडेविल्स यांच्यात शनिवारी झालेल्या सामन्यादरम्यान  सट्टा लावल्‍या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. राजू गडकरी असे या तरूणाचे नाव आहे. आयपीएलच्या सामन्यादरम्यान राजू गडकरी  सट्टा लावत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. या माहितीच्या आधारावर शिवाजी नगर व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. 

सट्याचे पैसे घेताना राजू गडकरीला रंगेहाथ पकडले. याशिवाय पोलिसांनी बेटींगच्या अड्यावरुन लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती मिळाली आहे.