Fri, Apr 19, 2019 12:33होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : अपघातात तरुण ठार; महिलेसह तिघे गंभीर 

कोल्‍हापूर : अपघातात तरुण ठार; महिलेसह तिघे गंभीर 

Published On: Jun 19 2018 1:32AM | Last Updated: Jun 19 2018 1:06AMवारणानगर  ः प्रतिनिधी   

वाठार- वारणानगर राज्य मार्गावर तळसंदे गावच्या वळणावर  कोडोलीकडे भरधाव जाणा-र्‍या पिक-अप टेम्पोने दोन मोटारसायकस्वारांना  समोरून धडक दिली. यामध्ये अरबाज दस्तगीर मुजावर (वय 20, रा. मांगले, ता. शिराळा, जि. सांगली)  हा जागीच ठार झाला, तर एका महिलेसह तिघेजण जखमी झाले.

अरबाज मुजावर व त्याच्या मागे बसलेल्या अजय संजय खोत (वय 20, रा. मांगले) आणि  त्यांच्या पाठीमागून येणार्‍या दुसर्‍या मोटारसायकलवरील विक्रम पांडुरंग दाभाडे (वय 49, रा. कोडोली), मागे बसलेल्या मालन खडू नाईक (वय 45, रा. जाखले) हे तिघेजण जखमी झाले आहेत.  यातील जखमी महिलेची प्रकृती गंभीर असून, तिला सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे. अन्य दोघांवर नवे पारगाव येथील महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी दुपारी याची वडगाव पोलिसांत नोंद झाली. 

अरबाज मुजावर व अजय खोत हे दोघेजण वाठार येथील अशोकराव माने इन्स्टिट्यूशन्समधील शैक्षणिक प्रवेशासंदर्भात मांगले येथून वाठारकडे मोटरसायकलवरून (क्र.एमएच-09-डीयू 2085) जात होते. त्यांच्याच मागोमाग मोटारसायकलवरून (क्र.एमएच-09-एयू-2982)विक्रम दाभाडे हे मालन नाईक यांना घेऊन वाठारच्या दिशेने जात होते. पाराशरनगर पारगाव येथे तळसंदे गावच्या वळणावर हे सर्वजण आले असता समोरून आलेल्या भरधाव पिक-अप टेम्पोने (क्र.एमएच-10-एसी-143) उजवीकडे येत दोन्ही मोटारसायकल स्वारांना जोरदार धडक दिली. यामध्ये अरबाज मोटारसायकलसह खाली जोरात आपला. त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. म.गांधी रुग्णालयात उपचारापूर्वीच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. 

त्याच्या मागे बसलेल्या अजय खोतच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. दुसर्‍या मोटारसायकलवरील विक्रमच्या डाव्या पायाला तर नाईक यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांना सीपीआरध्ये दाखल केले आहे. अपघातातील टेम्पोचालक घटनेनंतर पसार झाला होता. विच्छेदनानंतर अरबाजचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या अपघाताची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.

प्रवेश घेण्यासाठी जाताना काळाचा घाला...

यातील मयत अरबाज मुजावर व जखमी अजय खोत हे दोघेजण जिवलग मित्र असून, वाठार येथील अशोकराव माने इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी ते चालले होते. दोघेही इजनिअरिंग महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला जाणार होते. मात्र, मुजावर याच्यावर काळाने घाला 
घातला.