Wed, Apr 24, 2019 12:19होमपेज › Kolhapur › महाराष्ट्र दिनी कळंबा कारागृहात मर्दानी खेळाचे आयोजन (video)

महाराष्ट्र दिनी कळंबा कारागृहात मर्दानी खेळाचे आयोजन (video)

Published On: May 01 2018 11:19AM | Last Updated: May 01 2018 11:19AMचैतन्य डोंगरे : पुढारी ऑनलाईन 

कळंबा कारागृहात महाराष्ट्र दिनी जेल प्रशासनाकडून कैद्यांसाठी मर्दानी खेळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्राचा रांगडा आणि शिवकालीन खेळ म्हणजे मर्दानी खेळ. या खेळाचे आयोजन करण्याची संकल्पना कारागृह अधिक्षक शरद शेळके यांनी मांडली. 

कोल्हापुरातील मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर करणाऱ्या दोन गटांनी प्रात्यक्षिके सादर करुन कळंबा कारागृहातील कैद्यांची मने जिंकली. वरिष्ठ कारागृह अधिकारी जाधवर, कारागृह अधिकारी आवळे, परदेशी, आडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी हा उपक्रम राबवण्यात आपले योगदान दिले. 

दरम्यान कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांच्या पत्नी अरुंधती महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त महिला कैद्यांना साडी वाटप करण्यात आले. याचबरोबर खासदार महाडिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  

Tags : kolhapur, kolhapur news, Maharashtra din,kalamba jail authority,mardani khel demo